पुणे: शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.सिंहगड कॉलेजच्या ‘ पन्हाळा हॉस्टेल ‘ येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेले समीर माधव दाभोळकर यांनी आत्महत्या केली आहे.१८ महिन्यापासून पगार न मिळाल्यामुळे समीर दाभोळकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
अधिक माहितीनुसार, समीर दाभोळकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सिंहगड कॅम्पस येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.मात्र,मागील दीड वर्षांपासून त्यांना वेळेवर पगार मिळत नव्हता. वारंवार पाठपुरावा आणि तक्रार करून देखील पगार मिळत नसल्याने समीर दाभोळकर हे नैराश्यात गेले होते.
महत्वाचे म्हणजे,आत्महत्येपूर्वी समीर दाभोळकर यांनी त्यांचाच मोबाईल मध्ये एक व्हिडिओ शूट केला होता.आपल्या सोबत काम करणाऱ्या एका सहकाऱ्याशी बोलून आपली व्यथा देखील मांडली होती.सदरील व्हिडीओत त्यांनी भावनिक शब्दात ‘ मला माफ करा..मला १८ महिन्यापासून पगार मिळालेला नाहीये ‘ असे सांगितले असल्याचे समोर येत आहे.
कुणावर गुन्हा दाखल?
मयत समीर दाभोळकर यांचा मुलगा वृषभ दाभोळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिंहगड संस्थेच्या व्यवस्थापनाशी संबंधित नवले परिवारातील चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक एम. एन नवले, सचिव सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचना नवले आणि उपाध्यक्ष रोहित मारुती नवले यांच्यावर आत्महत्या प्रवृत्ती केल्याबद्दल भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No salary for 18 months; Sinhagad College security guard commits suicide, case registered against Navle family
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी