विशेष प्रतिनिधी
मुंबई : MP Anand Paranjpe शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत माजी खासदार आनंद परांजपे १४ वर्षांनंतर स्वगृही परतले. बाळासाहेब भवन येथे शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत परांजपे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.MP Anand Paranjpe
यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम, रविंद्र फाटक आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.MP Anand Paranjpe
आनंद परांजपे शिवसेनेत असताना परांजपे आणि शिंदे कुटुंबीयांचे जिव्हाळ्याचे नाते होते. मधल्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या आणि त्या त्यांनी कुठल्याही अपेक्षा न ठेवता पार पाडल्या असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. आनंद परांजपे यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाला फायदा होईल,असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दररोज वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राज्यात पक्षाची ताकद वाढत आहे. राज्यात एसआयआरचे काम सुरू असून शिवसेनेने एक लाखांहून अधिक बीएलओ नियुक्त केल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले.MP Anand Paranjpe
यावेळी परांजपे म्हणाले की, घरातूनच शिवसेनेचा वारसा मिळाला. शिवसेनेकडून दोनदा खासदार बनलो. त्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान होते. मी जरी दुसऱ्या पक्षात होतो तरी माझ्यात शिवसेनेचाच डीएनए आहे, असे परांजपे म्हणाले. मुख्यमंत्री असताना कॉमन मॅन म्हणून काम करणाऱ्या एकनाथजी शिंदे यांनी जनहिताचे अनेक मोठे निर्णय घेतले. त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन स्वगृही परतण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. पदाची कोणतीही अपेक्षा न ठेवता एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात संघटनेसाठी काम करण्याची इच्छा यावेळी परांजपे यांनी बोलून दाखवली.
Former MP Anand Paranjpe returns home, joins Shiv Sena in presence of Shrikant Shinde
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी