परभणी भाजपात पुन्हा अंतर्गत संघर्ष; गटनेते विश्वजित बुधवंत यांच्या नियुक्तीला स्थगिती

विशेष प्रतिनिधी

परभणी: महानगरपालिकेतील भाजपाचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.नवनियुक्त गटनेते विश्वजित बुधवंत यांच्या नियुक्तीला विभागीय आयुक्तांकडून स्थगिती देण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे आणि नगरसेविका तिरूमला खिल्लारे यांनी दाखल केलेल्या गंभीर तक्रारीनंतर ही स्थगिती देण्यात आल्याने, भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे.

महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी प्रोसेस आणि नगरसेविका तिरूमला खिल्लारे यांनी 12 मे रोजी छत्रपती संभाजी नगर विभागाचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडे आक्षेप अर्ज दाखल केला होता. या अर्जाद्वारे त्यांनी घटनेतील बदलण्याच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अर्जात त्यांनी नमूद केले होते की, अधिकृत संघटनेला कोणतीही पूर्वकल्पना न देता तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता गटनेते बदलण्याचा प्रस्ताव सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.सदर प्रस्तावर काही नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असून अनेक नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रस्तावाची वैधता आणि सत्यता याबाबत गंभीर शंका निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.



या आक्षेप अर्जाची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विश्वजित बुधवंत यांच्या भाजपाच्या गटनेते पद निवडीला स्थगिती दिली आहे.त्यामुळे परभणी परभणी महानगरपालिकेतील भाजपाच्या अंतर्गत राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पक्षातीलच दोन गटांमधील संघर्ष समोर येत आहे.

दरम्यान, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत स्वागताचे वातावरण निर्माण होत असतानाच दुसऱ्या बाजूला पक्षाचे जिल्हाध्यक्ष नियुक्त विरोधात अधिकृत तक्रार दाखल करत असल्याने परभणी भाजपामध्ये सगळं अलबेल नसल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

Internal conflict again in Parbhani BJP; Appointment of group leader Vishwajit Budhwant postponed