विशेष प्रतिनिधी
पुणे:आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल आणि आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. या दोन्ही मार्गांचे सुमारे ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामही येत्या काळात युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
पायाभूत सुविधांसोबतच जलसंधारणाचा नवा पॅटर्न!
केवळ रस्ते बांधणी न करता, या प्रकल्पातून पर्यावरणाचे रक्षण आणि ग्रामीण भागाचा विकास साधला जात आहे. या महामार्गाच्या कामासाठी लागणारी माती आणि मुरुम काढताना शास्त्रीय पद्धतीने खोदकाम करण्यात आले. यातून पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत ६६ नवीन तलाव आणि अमृत सरोवरांची निर्मिती झाली आहे.
याचा फायदा थेट ४७ गावांना होणार आहे.यातून महाराष्ट्र सरकारचे जलसंधारणाचे सुमारे ९४ कोटी रुपये वाचले आहेत.
दोन्ही पालखी मार्गाचा एकूण खर्च
वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा
२३४ किमीचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि १३० किमीचा संत Tukaram महाराज पालखी मार्ग आता चौपदरी झाले आहेत. विशेष म्हणजे, वारकऱ्यांना चालण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा स्वतंत्र पायी मार्ग तयार करण्यात आले आहेत. वारीदरम्यान होणारी गर्दी आणि अपघातांची शक्यता लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आले आहे.
हरित पालखी मार्गाचा संकल्प!
नितीन गडकरी यांनी या दौऱ्यात पर्यावरणावर विशेष भर दिला. या दोन्ही मार्गांच्या दुतर्फा ४०,००० वृक्षांची लागण करण्याचे नियोजन आहे. यामध्ये प्रामुख्याने वडाची झाडे, पिंपळ, कडुलिंब आणि इतर सावली देणाऱ्या वृक्षांचा समावेश असेल, जेणेकरून रणरणत्या उन्हात वारकऱ्यांना दिलासा मिळेल.
नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, “हे केवळ रस्ते नसून श्रद्धेचा मार्ग आहे. वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि भक्ती यांचा संगम या प्रकल्पात पाहायला मिळत आहे.”
या महामार्गामुळे केवळ वारीचा प्रवास सुसह्य होणार नसून, पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. आता वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने अधिक उत्साहात आणि सुरक्षितपणे पडतील, यात शंका नाही.
Transformation of Palkhi Marg: A Smooth Journey for Warkaris, Coupled with Water Prosperity and Natural Heritage!
महत्वाच्या बातम्या
- १०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा
- काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला; तमिळनाडूतील सत्तांतरावर मोदींचा हल्लाबोल
- अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी
- भोंदू अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांची एसआयटीसमोर चौकशी