विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे विधान परिषद निवडणुकीत अखेर नाट्यमय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार विक्रम काकडे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर या निर्णयामागील कारणांबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. Vikram Kakade
राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना पुणे विधान परिषद मतदारसंघात अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
अर्ज मागे घेण्याच्या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना श्रीकांत पाटील यांनी महत्त्वाचा दावा केला. त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला होता. या संभाषणानंतर शरद पवार यांनी आपला विचार बदलल्याचे त्यांनी म्हटले.
“निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये, या उद्देशाने शरद पवार यांनी निर्णय माझ्यावर सोपवला. सुनेत्रा वहिनींनी आपल्याला विनंती केली आहे, त्यामुळे अर्जाबाबत तुम्ही योग्य तो निर्णय घ्या, अशी सूचना त्यांनी केली. त्यानुसार मी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला,” असे श्रीकांत पाटील यांनी सांगितले.
पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर पुणे विधान परिषद निवडणुकीतील बिनविरोध निवडीमागील राजकीय घडामोडींवर चर्चा सुरू झाली आहे. अर्ज मागे घेतल्यामुळे विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे.
Vikram Kakade Elected Unopposed
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : सरकारी शिष्टमंडळाशी चर्चेनंतर मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित
- Baramati : विधवा महिलेचा छळ, बारामतीत विद्यमान नगरसेवकावर गुन्हा दाखल
- Ghatkopar : घाटकोपर येथील पालिका मराठी शाळा वाचविण्यासाठी हजारोंचा जनआक्रोश
- मराठा आरक्षणाबाबत संविधानाच्या चौकटीत बसणारा निर्णय, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन