अभिजीत दिपकेची भारतात येण्यापूर्वी पंतप्रधानांसोबत बैठक, संजय राऊत यांचा दावा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कॉक्रोच जनता पार्टीचा प्रमुख अभिजीत दिपकेची भारतात येण्यापूर्वी पंतप्रधानांसोबत बैठक झाली. त्याचे फोटो आपल्याकडे असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, अभिजित दीपके यांनी याचा इन्कार केला असून हे फाेटाे एआय असू शकतात असे म्हटले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अभिजीत दिपकेकडून केली जात असून, त्याच्या नेतृत्वात दिल्लीत आंदोलनही झाले. त्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला होता. मुंबईत माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, “अभिजीत दिपके आणि पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेत एक बैठक झाली. तिचे फोटो एकाने मला पाठवले आहेत. त्यानंतर अभिजीत दिपके भारतात आला, असे काही लोकांनी सांगितले. मी हे आरोप करत नाही. मला लोकांनी माहिती पोहोचवली आहे आणि ती मी सांगत आहे.

संजय राऊत म्हणाले, अभिजित दीपके याच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा दिला, मात्र जी काही माहिती या सगळ्यासंदर्भात समोर येत आहे, ती माध्यमांसमोर मांडणे आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता त्या आंदोलनाला गेला नाही. तरुणांचे प्रश्न आणि तरुणांना आम्ही पाठिंबा दिला\. जे काही तरुण रस्त्यावर उतरले आहेत, त्या तरुणांचे सरकारने ऐकायला हवे, यासाठी आम्ही भूमिका मांडली होती. या माध्यमातून सरकारला मदत केली जात असेल, तर त्यावर लक्ष ठेवणे आमचे काम आहे.

संजय राऊत यांनी केलेला दावा अभिजीत दिपके याने फेटाळून लावला आहे. दिपके म्हणाला की, “मला माहिती नाही. एआय वापरून तयार केलेले असू शकतात. कारण पंतप्रधानांना मी कसा भेटणार? मी तिथे एक साधा विद्यार्थी होतो.\”हे सुरू करायचा माझा कोणताही प्लॅन नव्हता. तुम्हाला प्रोटोकॉल माहिती आहेत. पंधरा दिवस आधी मी तिथे नोकरीसाठी अर्ज करत होतो. मी हे फक्त व्यंगात्मक अंगाने हे सुरु केलं होतं. त्यातून हे सुरू झाले.

माझे असे कोणतेही पूर्व नियोजन नव्हते किंवा उद्देश नव्हता की हे सुरू करायचं. माझा जर तसा प्लॅन असला असता, तर मी भारतात राहून केलं असतं. मी अमेरिकेत गेलो नसतो. दोन कोटींपेक्षा जास्त लोक या देशातील राजकीय पक्षांना मेसेज देत आहेत की, या देशातील तरुण अस्वस्थ आहे आणि त्याने तुमच्याकडून अपेक्षा ठेवणे सोडून दिले आहे.

Abhijeet Dipke Met Prime Minister Before Returning to India, Claims Sanjay Raut

महत्वाच्या बातम्या