Ujjwal Nikam : अशोक खरात प्रकरणात ॲड. उज्ज्वल निकम यांची राज्य सरकारकडून सरकारी अधिवक्ता म्हणून नियुक्ती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ujjwal Nikam अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि चमत्कारांच्या नावाखाली महिलांचे कथित लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता मोठी घडामोड झाली आहे. राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या या बहुचर्चित प्रकरणाच्या न्यायालयीन लढाईत नामांकित कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची अधिकृत एन्ट्री झाली आहे. त्यांच्या मदतीसाठी अहिल्यानगरचे अनुभवी फौजदारी वकील ॲड. परिमल फळे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागानं गुरुवारी (दि. 11 जून) यासंदर्भातील अधिसूचना जारी केली. त्यामुळं अशोक खरात प्रकरणातील खटल्याला आता अधिक धार प्राप्त झाली असून संपूर्ण राज्याचं लक्ष या सुनावणीकडं लागलं आहे.Ujjwal Nikam



राज्य सरकारनं अशोक खरात प्रकरणासाठी संवेदनशील प्रकरणासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांच्यावर विश्वास टाकत विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. आता त्यांच्या सोबत ॲड. परिमल फळे यांची नियुक्ती झाल्यानं सरकारची कायदेशीर बाजू अधिक भक्कम झाल्याचं मानलं जात आहे. राज्य सरकारच्या वतीनं कक्ष अधिकारी राजेश मांजरेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, अशोक खरातविरोधातील न्यायालयीन प्रक्रियेत सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी निकम-फळे या जोडीवर सोपविण्यात आली आहे.

ॲड. परिमल फळे हे फौजदारी कायद्यातील अनुभवी वकील म्हणून ओळखले जातात. राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्य हत्या प्रकरण, नेवासे येथील ॲड. रियाज पठाण हत्या प्रकरण यांसारख्या गाजलेल्या खटल्यांमध्ये त्यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासोबत सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली होती. याशिवाय रेखा जरे खून प्रकरण, संदीप वारळ हत्या प्रकरणासह अनेक चर्चित खटल्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राज्य सरकारनं पुन्हा एकदा निकम-फळे या अनुभवी आणि आक्रमक विधिज्ञ जोडीवर विश्वास दाखवल्यानं खटल्याच्या पुढील सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या नियुक्तीमुळं आरोपीविरोधातील कायदेशीर लढाई अधिक तीव्र होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Ujjwal Nikam appointed special public prosecutor in Ashok Kharat case

महत्वाच्या बातम्या