Sanjay Raut : मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांच्या निर्दोषमुक्तीला मेधा सोमैया यांचे हायकोर्टात आव्हान

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sanjay Raut सोमैया विरूद्ध राऊत या मानहानीच्या खटल्यात मुंबई सत्र न्यायालयानं संजय राऊत यांच्या बाजूनं दिलेल्या निकालाला मेधा सोमैया यांच्याकडून आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयानं फेब्रुवारी 2026 मध्ये मानहानीच्या खटल्यातून पुराव्यांअभावी निर्दोषमुक्त केलंय. मात्र आता भाजपा नेते किरीट सोमैया यांच्या पत्नी मेधा सोमैया यांनी संजय राऊत यांच्या निर्दोषमुक्तीला हायकोर्टात आव्हान दिलंय. या याचिकेवर गुरूवारी न्यायमर्ती शिवकमुमार डिगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा राऊत यांच्यावतीनं यावर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितल्यानं सुनावणी 3 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आलीय.Sanjay Raut

अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली होती. मुलुंडमधील कथित शौचालय घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांनी मेधा सोमैया यांच्या विरोधात मानहानीकारक वक्तव्य केल्याबद्दल माझगाव कोर्टानं संजय राऊत यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. त्याला राऊतांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र सुनावणीअंती सोमैया यांच्या आरोपांना सिद्ध करणारे पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचं स्पष्ट करत संजय राऊत यांना या मानहानीच्या खटल्यातून निर्दोषमुक्त केलं होतं.Sanjay Raut



रेकॉर्डवरील कागदपत्रं, चित्रफिती पाहता प्रदर्शनी राऊत यांनी 15 आणि 16 एप्रिल 2022 रोजी मेधा सोमैयांविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याचं स्पष्ट होत असल्याचं दंडाधिकारी कोर्टानं मान्य केलं होतं. त्यांनी केलेलं विधान अनेक लोकांनी ऐकलं आणि वर्तमानपत्रातूनही वाचलेलं आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे याचिकाकर्त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचल्याचही त्यांनी पुराव्यातून स्पष्ट होत असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं. त्यामुळे याचिकेतील कलम 499, 500 नुसार आरोपी दोषी असल्याचंही कोर्टानं मान्य केलं होतं. या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांना माझगाव दंडाधिकारी न्यायालयानं 26 सप्टेंबर 2024 रोजी दोषी ठरवत त्यांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंडही आकारला होता.

भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली होती. त्यातील 16 शौचालयं बांधण्याचं कंत्राट मेधा सोमैयांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाल होतं. मात्र या कामात बनावट कागदपत्रं सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करत मेधा सोमैयांनी 100 कोटी रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. याशिवाय या कामात पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याचा दावाही करण्यात आला होता. त्यानंतर प्रतिक्रिया देताना, आता ‘घाण’ करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत? पुरावे कुठे आहेत हेही माहिती आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मेधा सोमैया आणि त्यांच्या कुटुबानंच केलेला हा घोटाळा असल्याचं त्यावेळी संजय राऊत माध्यमांसमोर जाहीरपणे म्हणाले होते.

Medha Somaiya challenges Sanjay Raut’s acquittal in defamation case in High Court

महत्वाच्या बातम्या