‘सर्वच आरोपी निर्दोष सुटले, तर माझ्या वडिलांना मारलं कुणी?’- ओमराजे निंबाळकर यांचा पुण्यात संतप्त सवाल!

विशेष प्रतिनिधी

पुणे: बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना आपल्या भावनांना वाट करून दिली. जर या प्रकरणातील सगळेच आरोपी निर्दोष सुटत असतील, तर मग पवनराजे निंबाळकर यांना मारले कुणी ? हा मोठा प्रश्न आज माझ्या आणि माझ्या कुटुंबासमोर उभा राहिला आहे,असा अत्यंत भावूक आणि संतप्त सवाल ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्य पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, आपण या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले. Omraje Nimbalkar

माध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले, “राज्य सरकारच्या पोलिसांनी या प्रकरणात जो तपास केला, त्यात प्रचंड त्रुटी होत्या हे आता स्पष्ट झाले आहे. आम्ही सुरुवातीलाच या केसचा तपास सीबीआय (CBI) कडे वर्ग करण्याची मागणी केली होती. मात्र, हा तपास सीबीआयकडे जाईपर्यंत तब्बल तीन वर्षांचा मोठा कालावधी निघून गेला. सीबीआयने या प्रकरणात चांगला तपास केला होता, मात्र तरीही निकाल असा लागल्याने धक्का बसला आहे. आम्ही या निकालाची प्रत पूर्ण वाचल्यानंतर उच्च न्यायालयात (High Court) दाद मागणार आहोत.”



वडिलांच्या हत्येचा उल्लेख करताना ते भावूक झाले. “मी गेल्या २० वर्षांपासून या निकालाची वाट पाहत होतो. माझ्या वडिलांची हत्या झाली, तेव्हा एका मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला काय वाटलं असेल, याची कल्पना कोणी करू शकत नाही. दुर्दैवाने या समाजात चांगल्या माणसाला कायम निराशाच पदरात पडते की काय, अशी परिस्थिती आहे. हत्येचा निकाल तर आला, मात्र यावरून प्रत्यक्षात हत्या कोणी केली हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही. दोशींना (मुख्य आरोपी) कडक शिक्षा व्हावी, हीच माझी आणि शासनाकडून अपेक्षा आहे,असे निंबाळकर म्हणाले.

दोन दिवसांत राजकीय भूमिका स्पष्ट करणार!

गेल्या वीस वर्षांपासून ओमराजे या निकालाच्या प्रतीक्षेत होते. आणि सध्या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आपला राजकीय निर्णय ते या निकालानंतर घेणार असं त्यांनी सांगितलं होतं. याच प्रश्नावर बोलताना निंबाळकर म्हणाले की 2022 ला ही शिवसेना फुटली होती तेव्हाही मी त्यांच्यासोबत जाऊ शकलो असतो पण मी गेलो नाही आणि आता मी जाणार असे आरोप होत आहे.माझा राजकीय निर्णय काही असला तरी उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेब यांच्या बद्दल कधीच बोललो नाही आणि बोलणार नाही असं त्यांनी भाष्य केलं. याच्या दोन दिवसात मी माझा राजकीय निर्णय स्पष्ट करेन असं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

then who killed my father?” – Omraje Nimbalkar asks angrily in Pune!

 

महत्वाच्या बातम्या