Uddhav Thackeray : ‘गद्दारीचा शिक्का कसा पुसणार?’; ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरेंचा घणाघात, फडणवीसांबाबतही मोठा दावा

विशेष प्रतिनिधी

धाराशिव: Uddhav Thackeray “एका भाषणात त्यांनी खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांचा उल्लेख केला होता. आता स्वतःवरील गद्दारीचा शिक्का ते कसा पुसणार? मी प्रचारावेळी म्हटले होते की माझ्याकडे दोन वाघ आहेत. पण त्यातील एक वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा निघाला, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर केला.Uddhav Thackeray

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव दौऱ्यात माजी सहकारी आणि विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांना “वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा” अशी उपमा दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अंतर्गत राजकारणावरही निशाणा साधत मोठे राजकीय दावे केले.Uddhav Thackeray



धाराशिवमधील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना ठाकरे म्हणाले, “काही जण म्हणतात उद्धव ठाकरे फिरत नाहीत. पण उद्धव ठाकरे फिरायला लागले की काय होतं, ते आज महाराष्ट्र पाहत आहे. या सभा नाहीत, या माझ्या कौटुंबिक बैठका आहेत. त्यांनी कितीही आमदार फोडले तरी तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.”

लोकसभा निवडणुकीच्या आठवणींना उजाळा देताना ठाकरे म्हणाले, “समोरच्यांकडून पैशांचा पाऊस पडत होता. अशा परिस्थितीत एका गरीब शेतकऱ्याने स्वतःजवळचे पैसे आमच्या उमेदवारासाठी दिले. त्यावेळी मी ज्याच्यासाठी प्रचार केला, त्याच्याच सभेत तो शेतकरी आला होता. मात्र, निवडून आल्यानंतर तो खासदार लोकांचे फोन उचलत नाही. मी स्वतः फोन केला तरी प्रतिसाद मिळाला नाही.”

भाजपमधील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, “मिंदेसेनेचे भवितव्य काय आहे? हे खासदार तिकडे का गेले? कारण भाजपमध्ये गटबाजी सुरू आहे आणि ‘ऑपरेशन देवेंद्र’ सुरू आहे. काही दिवसांत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दुसऱ्या कोणाला दिली, तर आश्चर्य वाटणार नाही.”

ते पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस दिल्लीचे स्वप्न पाहत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही भविष्यात त्यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ शकतो. त्यामुळे २०२९ पर्यंत पंतप्रधानपदासाठी संभाव्य चेहरे बाजूला करण्याचे राजकारण सुरू आहे.”

ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, ओमराजे निंबाळकर आणि भाजपकडून या आरोपांना काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

How Will You Erase Uddhav Thackeray the Stigma of Betrayal?’:

महत्वाच्या बातम्या