विशेष प्रतिनिधी
पुणे :-प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शहरातील सर्व मनपा आणि खासगी प्राथमिक शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी हे नवे वेळापत्रक लागू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याआधी हे नवीन वेळापत्रक नक्की तपासा.
हा निर्णय १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीसाठी लागू राहणार आहे.तसेच खाजगी शाळांना ही नियम लागू असणार आहे.दरम्यान निवडणूकीच्या या विशेष मोहिमेसाठी अनेक प्राथमिक शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिक्षकांना शाळेचे अध्यापन सांभाळून निवडणुकीचे काम वेळेत पूर्ण करता यावी यासाठी हा सुवर्णमध्य काढण्यात आला आहे. सकाळच्या सत्रात शाळा संपल्यानंतर शिक्षकांना दुपारच्या वेळेत मतदार नोंदणी, नाव पडताळणी आणि इतर प्रशासकीय कामे करण्याकरता पुरेसा वेळ मिळणार आहे.
शाळेच्या अचानक झालेल्या या बदलामुळे विध्यार्थी किंवा पालकांची धांदल उडू नये म्हणून , पालकांना या वेळेची माहिती त्वरित देण्याची सूचना प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे यांच्या काढून करण्यात आली आहे.शाळांनी आपल्या पालक-शिक्षक संघ, व्हॉट्सॲप ग्रुप आणि नोटीस बोर्डच्या माध्यमातून प्रसिद्ध करावी, जेणे करून पालकांना नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा असे आदेश देण्यात आले आहेत.
Parents, take note! Rules for a school in Pune have changed
महत्वाच्या बातम्या
- तिसऱ्या कार्यकाळात मोदी सरकारने नेमके केले काय?? आणि पुढे करणार काय??, वाचा तपशीलवार!!
- HSRP : HSRP नंबर प्लेट नसल्यास उद्यापासून थेट कारवाई; मुदतवाढ संपली, परिवहन मंत्र्यांचा इशारा
- सचिन अहिरविरोधात पत्रकारांसमोर फटकेबाजी; पण विधान परिषदेच्या उपसभापतींच्या निवडणुकीत माघारी!!; संदेश काय गेला??
- गडचिरोलीत माओवाद्यांविरोधात आणखी एक निर्णायक कारवाई; बालबेडा जंगलात शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून नष्ट!!