Lullanagar : लुल्लानगरमधील कॅफेत रचला गेला केतन हत्येचा कट?पोलिसांकडून सिया गोयलची घटनास्थळी नेऊन चौकशी

विशेष प्रतिनिधी

पुणे :Lullanagar केतन अगरवाल हत्याकांडाच्या तपासात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. केतनला लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून ठार मारण्यापूर्वी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी लुल्लानगरमधील एका कॅफेमध्ये भेट घेऊन कट रचल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.Lullanagar

या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आज (गुरुवारी) सकाळी सिया गोयल हिला संबंधित कॅफेमध्ये नेऊन चौकशी केली Lullanagar



तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, केतनच्या हत्येपूर्वी सिया आणि चेतन यांनी लुल्लानगर परिसरातील एका मोकळ्या जागेत दोन वेळा प्रात्यक्षिक स्वरूपात हालचालींचा सराव केल्याचे समोर आले आहे. केतनला गड-किल्ल्यांवर फिरण्याची आवड असल्याने आरोपींनी गुन्ह्यासाठी लोहगड किल्ल्याची निवड केल्याचा संशय पोलिसांना आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येच्या आदल्या दिवशी सिया आणि चेतन यांनी लुल्लानगरमधील एका कॅफेमध्ये भेट घेतली होती. या भेटीत गुन्ह्याचे नियोजन करण्यात आल्याचा तपासाचा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर दोघांनी मोकळ्या जागेत जाऊन कथितपणे संपूर्ण कटाचा सराव केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंच्या आधारे पोलिसांनी संबंधित कॅफेची पडताळणी केली. सिया आणि चेतन नेमके कुठे बसले होते, ते तेथे किती वेळ थांबले होते, त्यांनी कोणाशी संवाद साधला होता का, तसेच त्या दिवशीच्या हालचालींचा तपशील काय होता, याबाबत सियाकडून माहिती घेण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून विविध बाबींची पडताळणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली

Suspected Murder Plot Hatched at Lullanagar Café? Police Take Siya Goyal for Spot Investigation

महत्वाच्या बातम्या