पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी, २४ तासांत अनेक तालुक्यांत १०० मिमीहून अधिक पाऊस

विशेष प्रतिनिधी

पुणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळला. काही ठिकाणी १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. Heavy Rain



पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचणे, दरडी कोसळणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच घाट परिसरातील मार्गांवर प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महसूल विभाग, NDRF आणि PMRDA पथके सतर्क ठेवण्यात आली असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
हवामान विभागाने पुढील काही तासांतही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Heavy Rain Batters Pune District, Several Talukas Receive Over 100 mm Rainfall in 24 Hours;

महत्वाच्या बातम्या