Khadakwasla : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात ११ तासांत १.३९ टीएमसीची वाढ

विशेष प्रतिनिधी

पुणे : Khadakwasla गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी मानली जात आहे.Khadakwasla

सोमवारी सकाळी ६ वाजता धरण साखळीतील एकूण पाणीसाठा ६.९३ टीएमसी इतका होता. मात्र दिवसभर झालेल्या पावसामुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा साठा ८.३२ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. अवघ्या ११ तासांत तब्बल १.३९ टीएमसी पाण्याची भर पडल्याने जलसाठ्यात मोठी वाढ नोंदवली गेली आहे.Khadakwasla



सायंकाळी ५ वाजेपर्यंत खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये मिळून १,४०७ एमसीएफटी पाण्याची आवक झाली. सध्या धरण साखळीतील एकूण पाणीसाठा ८.३२ टीएमसी असून तो एकूण क्षमतेच्या २८.५५ टक्के इतका झाला आहे.

धरणनिहाय आकडेवारीनुसार, खडकवासला धरण परिसरात ४२ मिमी पावसाची नोंद झाली असून धरणात ०.६८ टीएमसी पाणीसाठा आहे. पानशेत धरण परिसरात ७७ मिमी पाऊस पडला असून तेथे ३.३६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. वरसगाव धरण परिसरातही ७७ मिमी पावसाची नोंद झाली असून धरणातील साठा ३.७३ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. सर्वाधिक १६५ मिमी पाऊस टेमघर धरण परिसरात झाला असून तेथे ०.५६ टीएमसी पाणीसाठा आहे.

धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने येत्या काही दिवसांत पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळातील पाणीपुरवठ्याबाबत पुणेकरांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

Relief for Pune: Khadakwasla Dam Chain Water Storage Rises by 1.39 TMC in Just 11 Hours

महत्वाच्या बातम्या