जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेने तीन वारकरी महिलांचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी

जेजुरी : जेजुरी जवळील भाेंगळे मळा येथे वारकऱ्यांच्या टेम्पाेला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जेजुरी परिसरातील भोंगळे मळा परिसरात एका ट्रकने वारकऱ्यांच्या टेम्पोला धडक दिली . यामध्ये 15 ते 16 वारकरी जखमी झाले होते. हे वारकरी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसोबत जात असताना हा प्रकार घडला. यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला असून आणखी काही वारकऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.



ज्ञानोबा माऊलींची पालखी काल जेजुरी मुक्कामी होती. सासवडचा मुक्काम संपल्यानंतर आज पालखी जेजुरीत येणार आहे. आज सकाळी वारकऱ्यांनी जेजुरीच्या दिशेने चालायला सुरुवात केली होती. या रस्त्याला एका बाजूने वाहने सोडली जात आहेत.

यापैकी एका ट्रकने मागून वारकऱ्यांना धडक दिल्याची माहिती आहे. या वारकऱ्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. त्यांच्यावर उपचार सुरु असून तिघांची प्रकृती गंभीर होती. यापैकी तीन महिलांचा मृत्यू झाला आहे.

Three women Warkaris killed after truck hits pilgrims near Jejuri

महत्वाच्या बातम्या