अंगणवाडी सेविकेचे अपहरण ; डांबून ठेऊन ९६ हजारांची लूट

विशेष प्रतिनिधी

अहिल्यानगर :-गंगापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकेला लिफ्टच्या बहाण्याने अपहरण करून दिवसभर डांबून ठेवत मारहाण आणि लूट robbed केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी अवघ्या २४ तासांत आरोपी अशोक तांबे यास पोलिसांनी अटक केली आहे.

गंगापूर तालुक्यातील ताराबाई झिंजुडे या अंगणवाडी सेविका असून त्या गुरुवारी देवगडला जाण्यसाठी देवगड फाट्याला उभ्या होत्या. त्यावेळी एका कार चालकाने “मलाही देवगडला जायचे आहे, तुम्हाला सोडतो ” असे सांगत कारमध्ये बसवले. मात्र कार देवगडकडे न नेता त्याने नेवासाच्या दिशेने वळवली.



आरोपीने ताराबाई झिंजुडे यांना रात्री ९.३० पर्यंत कारमध्ये डांबून ठेवले.विरोध केला असता आरोपीने मोबाइल हिसकावून घेतला.त्यानंतर एका निर्जन रस्त्यावर कार थांबवून लोखंडी रॉडने वार करत त्यांना गंभीर जखमी केले असल्याचा आरोप केला आहे.

चाकूचा धाक दाखवत ९६ हजार लुटले

त्यानंतर चाकूचा धाक दाखवत गळ्यातील सुमारे सात ग्रॅम सोन्याची पोत, पाच ग्रॅम सोन्याचे कानातले व ७०० रुपये असा ऐकून ९६ हजारांचा ऐवज लुटून घेऊन फरार झाल्याची फिर्याद करण्यात आली आहे.तसेच साडीचा पदर फाडून हाथ पाय बांधून ओरडल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.आरोपी दिवसभर फिरून रात्री ९.३० च्या सुमारास ताराबाई झिंजुडे यांना सोडून तिथून फरार झाला.जखमी अवस्थेत त्यांनी प्रथम गंगापूर येथील हॉस्पिटल मध्ये उपचार घेतले.यानंतर शनिवारी त्यांनी नेवासा येथील पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने वेगाने हालचाल करत रविवारी आरोपीला अटक केली.

Anganwadi worker abducted; held captive and robbed of ₹96,000.

महत्वाच्या बातम्या