विशेष प्रतिनिधी
मुंबई : CM Fadnavis शहरांना विकासाचे केंद्र मानून त्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडच्या माध्यमातून विकास करण्यात यावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (13 जुलै) केली. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.CM Fadnavis
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘वर्षा’ निवासस्थानी नगर विकास विभागाच्या आढावा बैठकीत अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करताना महाराष्ट्राने या दृष्टीने पावले टाकली असून यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर निधी उभारणी करून पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसाठी निधी उभारल्याची माहिती दिली. या महानगरपालिकांच्या निधी उभारणीसाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी मिळाली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड आणि नागपूर महापालिका येथील काही प्रकल्पांना या पद्धतीने निधी उपलब्ध होणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.CM Fadnavis
या अभियानांतर्गत सुमारे 22 प्रमुख घटकांचा समावेश करण्यात येणार असून त्यामध्ये डिजिटल प्रशासन, मुख्य नागरी पायाभूत सुविधांचा विकास, चक्रीय अर्थव्यवस्था, वाहतूक कोंडी कमी करणारे प्रकल्प, शेवटच्या टप्प्यातील जोडणी, 5 ते 20 चौ.कि.मी. क्षेत्रातील शहर भागांचे पुनरुज्जीवन, लहान आणि मध्यम शहरे हे विकासाची केंद्र, पायी चालणारे आणि सायकलस्नेही वाहतूक प्रकल्प, निदर्शक प्रकल्प, ट्रान्झिट हब उन्नतीकरण, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट पायाभूत सुविधा विकास, शहर-विकास केंद्र, शहरांचे सृजनशील पुनर्विकास तसेच पाणी पुरवठा आणि स्वच्छता प्रकल्प आदींचा समावेश आहे.
बैठकीत अर्बन चॅलेंज फंडासाठीच्या वित्तीय आकृतीबंधाबाबत चर्चा करण्यात आली. अभियानात 90 हजार कोटींचा प्रकल्प निधी प्रस्तावित आहे. महाराष्ट्रासाठी केंद्र आणि राज्य शासनाचा प्रत्येकी 11 हजार 200 कोटी आणि बाजाराधारित स्रोतांतून 22 हजार 400 कोटी असा एकूण 44 हजार 800 कोटींच्या प्रकल्पांना चालना मिळू शकते, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
Create an Urban Challenge Fund to drive city development, says CM Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा