विशेष प्रतिनिधी
मुंबई :- गेल्या १७ दिवसांपासून नीट पेपर फुटीची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजानामा द्यावी ही मूळ मागणी करत दिल्लीतील जंतर मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक उपोषणाला बसले आहेत.मात्र, सरकारने अद्याप आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नाही.याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी 2011 सालच्या अण्णांच्या आंदोलनाची आठवण मोदी सरकारला करून दिली आहे.
राजू शेट्टी आपल्या पोस्टमध्ये सांगतात, 2011 साली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि एका मजबूत भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या निर्मितीसाठी म्हणजेच ‘जन लोकपाल विधेयक’ संमत करावे या प्रमुख मागणीसाठी रामलीला मैदानावर आमरण उपोषण केले होते. मी त्यावेळेस लोकसभेचा सदस्य होतो. अण्णा हजारे यांनी केलेली मागणी मान्य करावी म्हणून विरोधी पक्षातील सुषमा स्वराज , अरूण जेटली , गोपीनाथ मुंडे , नितीन गडकरी,राजनाथ सिहं, कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश कारत, ए. बी. बर्धन, तेलुगु देशम पक्षाचे चंद्राबाबू नायडू, आणि जनता दल युनायटेडचे शरद यादव या नेत्यांनीही संसदेत अण्णांच्या आंदोलनाचा जोरदार आवाज उठवला होता.
CM Fadanvis : अजितदादांच्या पुण्यतिथीआधी अपघाती निधनाचा अंतिम अहवाल, मुख्यमंत्र्यांची माहिती
गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी मी आणि मुंडे साहेब बसलो असताना विलासराव देशमुख यांचा मुंडे साहेबांना फोन आला व आपण कुठे आहात मी आपणास भेटायला येणार आहे असे सांगून आंदोलनाच्या चौथ्या दिवशी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा निरोप घेऊन तत्कालीन मंत्री विलासराव देशमुख हे गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी आले होते. जवळपास दीड ते दोन तास या आंदोलनाबाबत विलासराव देशमुख व गोपीनाथराव मुंडे यांची चर्चा झाली तत्कालीन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा करून दोन वेळा विलासराव देशमुखांनी त्याठिकाणाहून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोन जोडून दिला.
त्यानंतर पुढील आठ दिवस विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे या दोघांनी समन्वयकाची भूमिका बजावली व सरकारने संसदेत जन लोकपालच्या प्रमुख मागण्यांवर ‘संसद संकल्प’ एकमताने मंजूर केल्यानंतर 28 ऑगस्ट 2011 रोजी आंदोलन संपले. त्यावेळेस अण्णा हजारे यांनी विलासराव देशमुख यांना “सृजन प्रशासक” एक सुसंस्कृत, शब्दाचा पक्का आणि जनभावना समजणारा नेता” म्हणून माध्यमांसमोर व्यक्त केला.असा लिहून राजू शेट्टींनी जुनी आठवण सांगितली आहे
Raju Shetti reminded of Anna’s agitation as Sonam Wangchuk’s health deteriorates.
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा