साेनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात हलवण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले. त्यांच्यावरील उपचारासाठी मेदांता येथे डॉक्टरांचे एक पॅनल स्थापन करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश देण्यात आला. Sonam Wangchuk

सोनम यांनी २८ जूनपासून उपोषण सुरू आहेत. प्रकृती खालावल्यामुळे १८ जुलै रोजी पोलिसांनी त्यांना जंतरमंतरवरून सफदरजंग रुग्णालयात हलवले होते. त्यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका त्यांच्या पत्नीने न्यायालयात दाखल केली होती.

पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयातून एका खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी केली. परंतु, रुग्णालय प्रशासनाकडून कोणतेच उत्तर येत नसल्याचने गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. सोनम वांगचुक यांना तात्काळ सफदरजंग रुग्णालयातून मुक्त करण्यात यावे किंवा इतर हॉस्पिटमध्ये नेण्यात यावे, अशी मागणी गीतांजली यांनी याचिका दाखल करत केली.



तसेच, या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यात यावी, अशी सुद्धा मागणी त्यांनी केली होती. परंतु, त्यावेळी न्यायालयाने या याचिकेवर तत्काळ सुनावमी करण्यास नकार दिला. मात्र, आज मंगळवारी ) हे प्रकरण प्रत्यक्ष सुनावणीसाठी घेण्यात आले. ज्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयाने वांगचुक यांना दिलासा देत त्यांना मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले आहेत

दरम्यान, जंतरमंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन मंगळवारी २3 व्या दिवशीही सुरूच राहिले. दुपारपर्यंत तिथे हजारो आंदोलक उपस्थित होते. त्याआधी सकाळी काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना नाश्त्याचे वाटप केले.

सुरक्षेच्या व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी आज सकाळी पोलीस तिथे पोहोचले असता सीजेपी च्या समर्थकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. तत्पूर्वी, ‘संसद मोर्चा’नंतर सोमवारी उशिरा दिल्ली पोलिसांनी जंतरमंतर परिसर रिकामा केला होता, परंतु आंदोलक रात्री उशिरा पुन्हा तिथे एकत्र जमले.

Delhi HC Orders Sonam Wangchuk’s Shift to Medanta Hospital

महत्वाच्या बातम्या