विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Dharmendra Pradhan अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर शनिवार (25 जुलै) केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला यश आले आहे. गेल्या महिनाभरापासून नीट पेपरफुटी प्रकरणावरून कॉक्रोच जनता पार्टीने देशभरात विद्यार्थ्यांसोबत एक मोठे आंदोलन उभे केले होते. नवी दिल्लीतील जंतरमंतरवर मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत तीन मागण्या मान्य केल्याशिवाय आपले आंदोलन मागे घेणार नसल्याचे अनेकदा स्पष्ट केले होते. यानंतर अखेर शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या काळात पहिल्यांदा एखाद्या मंत्र्याने आरोप झाल्यानंतर आपली जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे.Dharmendra Pradhan
सोशल मीडियावर पत्र टाकत धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की, “3 मे 2026 रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेत अनियमितता झाल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर सरकारने तात्काळ कारवाई केली. तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला, परीक्षा रद्द करून तिचे पुनर्नियोजन करण्यात आले आणि पुढील वर्षापासून नीट परीक्षा पूर्णपणे संगणक-आधारित (CBT) पद्धतीने घेतली जाईल, अशी घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली आहे.Dharmendra Pradhan
यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “मी गेल्या 4 दशकांपेक्षा जास्त काळापासून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित राहिलो आहे. एक सशक्त, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्थाच एका सशक्त राष्ट्राची पायाभरणी असते, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे. मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारतातील तरुण पिढीची स्वप्ने साकार करणे हा आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा नैतिक संकल्प राहिला आहे. आदरणीय पंतप्रधानांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली राष्ट्रसेवा करण्याची जी संधी मला मिळाली, त्याबद्दल मी मा. पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो.” असेही त्यांनी यामध्ये म्हटले आहेत.
“या कालावधीत २० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडावी, ही आमची मुख्य प्राथमिकता होती. यासाठी संपूर्ण सरकार दृष्टिकोन ठेवून काम करण्यात आले. यामध्ये भारत सरकारसोबतच राज्य सरकारे, खासकरून जिल्हा प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. तसेच विद्यार्थी, पालक आणि माता-पित्यांच्या सहकार्याने 21 जून 2026 रोजी ही परीक्षा पूर्ण झाली. पहिल्या दिवसापासूनच मी याची जबाबदारी घेतली आणि या परिस्थितीपासून कधीही तोंड लपवले नाही. परीक्षा माफियामुळे आपण कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याची शक्यता खराब होऊ देणार नाही, कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, हा माझा संकल्प होता.” असे स्पष्टीकरण त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेल्या पत्रात लिहिले आहे.
Union Education Minister Dharmendra Pradhan finally resigns
महत्वाच्या बातम्या
- Dr Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
- पुण्याची वाहतूककोंडी फोडणार तीन महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- आपलं म्हणणं खरं करणं यालाच हुकूमशाही म्हणतात, उद्धव ठाकरे यांची टीका