Government-CJP Talks : सरकार-सीजेपी बैठक; तीन मागण्या, पाच सूचना सरकारसमोर, दोन तासांच्या चर्चेनंतर शनिवारी पुन्हा बैठक

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Government-CJP Talks नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि सीजेपी प्रतिनिधींमध्ये शुक्रवारी महत्त्वाची बैठक पार पडली. Government-CJP Talks

विठ्ठलभाई पटेल हाऊस येथे झालेल्या या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी CJP प्रतिनिधींशी सुमारे दोन तास सविस्तर चर्चा केली. Government-CJP Talks

बैठकीदरम्यान CJP ने परीक्षा पद्धतीतील सुधारणा, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे संरक्षण आणि पेपरफुटीमुळे प्रभावित विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित तीन प्रमुख मागण्या



सरकारसमोर मांडल्या. याशिवाय परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी पाच महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, सरकार CJP च्या मागण्या आणि सूचनांचा सविस्तर विचार करणार आहे. शनिवारी दुपारी CJP प्रतिनिधींसोबत पुन्हा बैठक घेऊन केंद्र सरकारची अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाईल.

CJP च्या वतीने मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सरकारशी चर्चा केली.

सरकारसोबतच्या बैठकीपूर्वी CJP ने चर्चेसाठी दोन महत्त्वाच्या अटी ठेवल्या होत्या. शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये आणि पेपरफुटीमुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीवरही CJP कायम आहे. या मागणीबाबत केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे विद्यार्थ्यांसह देशभरातील आंदोलकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, CJP च्या आंदोलनाला पाठिंबा देत उपोषणावर बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनंतर उपोषण सोडले आहे.

गुरुवारी रात्री उशिरा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन वांगचुक यांची भेट घेतली. सरकारच्या वतीने त्यांना लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

सोनम वांगचुक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर व्हिडिओ पोस्ट करत उपोषण संपवत असल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारकडून ठोस आणि वेळबद्ध कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Government-CJP Talks: Three Demands, Five Suggestions; Fresh Meeting on Saturday

महत्वाच्या बातम्या