Chhawa ‘छावा’ चित्रपटाचा दणदणीत गल्ला, ₹३२६.७५ कोटींचा टप्पा पार

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट छावाने दुसऱ्या आठवड्यातही दमदार कामगिरी कायम ठेवली आहे. आहे, १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

छावाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ₹३२६.७५ कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या रविवारी या चित्रपटाने ₹४० कोटींची कमाई केली असून, त्यामुळे त्याचा एकूण भारतातील गल्ला ₹३२६.७५ कोटींवर पोहोचला आहे. पहिल्या आठवड्यातच या चित्रपटाने ₹२१९.२५ कोटींची कमाई केली होती.

चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ₹३१ कोटींच्या भक्कम कमाईसह सुरुवात केली होती. पहिल्या शनिवार-रविवारी अनुक्रमे ₹३७ कोटी आणि ₹४८.५ कोटींची कमाई करत छावाने दमदार ओपनिंग मिळवले. दुसऱ्या शुक्रवारी या चित्रपटाने ₹२३.५ कोटी कमावले, तर गुरुवारी ही कमाई ₹२१.५ कोटी होती. शनिवारी तब्बल ८७.२३% वाढीसह ₹४४ कोटींची कमाई झाली.

Dhananjay Munde दमानियांच्या आरोपांना धनंजय मुंडेंचे उत्तर, शासन कार्य नियमावलीनुसार GR काढल्याचा दावा

संभाजी महाराजांविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत असल्याने विकी कौशलने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये कृतज्ञता व्यक्त केली. “आता ते ‘Unsung’ हिरो राहिले नाहीत! सर्वांचे आभार… छत्रपती संभाजी महाराज की जय,” असे विकीने लिहिले.

छावाche नुकते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले होते. दिल्लीत आयोजित ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भाषण देताना मोदी म्हणाले, “हे महाराष्ट्र आणि मुंबईच आहेत ज्यांनी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीला उंची दिली आहे. सध्या छावाचीच चर्चा आहे.”

शिवाजी सावंत यांच्या छावा याच नावाच्या कादंबरीवर आधारित असलेल्या या चित्रपटात डायना पेंटी, दिव्या दत्ता आणि आशुतोष राणा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Chhawa’ film hits ₹326.75 crore mark

महत्वाच्या बातम्या