छावा’ने अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द राईज’ चित्रपटाला ‘ कमाईत टाकले मागे, रचला नवा विक्रम

विशेष प्रतिनिधी

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा असणाऱ्या छावा चित्रपट महाराष्ट्रातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द राईज’ या चित्रपटाला ‘छावा’ने मागे टाकलं आहे. ‘पुष्पा 2’ने महाराष्ट्रातत 250 कोटी रुपयांची कमाई केली होती

अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचत आहे. 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातही ‘छावा’ची दमदार कमाई सुरू आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 16 व्या दिवशी म्हणजे1 मार्च, 2025 रोजी 21 कोटी रुपयांची कमाई केली. पंधराव्या दिवशी या चित्रपटाची कमाई 13 कोटी रुपये झाली होती. सोळाव्या दिवसाच्या कमाईत थेट 61 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली.

या चित्रपटाने आतापर्यंत 433.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईसह ‘छावा’ आता देशातील 12 सर्वांत हिट चित्रपटांच्या यादीत पोहोचला आहे. या यादीत ‘छावा’ने ‘2.0’ आणि ‘सलार: पार्ट वन- सीझफायर’ या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

प्रदर्शनाच्या तिसऱ्या शुक्रवारच्या कमाईच्या बाबतीतही विकी कौशलच्या चित्रपटाने अल्लू अर्जुनच्या चित्रपटाला मागे टाकलं आहे. ‘छावा’ने प्रदर्शनाच्या तिसऱ्या शुक्रवारी 13 कोटी रुपयांचा गल्ला जमवला, तर ‘पुष्पा 2’ने 11.30 कोटी रुपये कमावले होते.

जगभरातील कमाईच्या बाबतीत अद्याप ‘पुष्पा 2’च अग्रस्थानी आहे. ‘पुष्पा 2’ने जगभरात 1742.1 कोटी रुपये कमावले आहेत. तर ‘छावा’ची आता पर्यतची जगभरातील कमाई ही 590 कोटींवर पोहोचली आहे.

Chhaava sets a new record, Allu Arjun’s ‘Pushpa 2: The Rise’ behind in earnings

महत्वाच्या बातम्या