Swargate rape : स्वारगेट बलात्कार पीडिता आरोपीच्या संपर्कात नसल्याचे तांत्रिक विश्लेषणात उघड

पुणे : Swargate rape  स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेच्या मोबाइल संचाची तांत्रिक तपासणी करण्यात येत असून, पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे तांत्रिक तपासणीत उघडकीस आले आहे.Swargate rape

परगावी निघालेल्या प्रवासी तरुणीला दत्तात्रय गाडेने प्रवासी तरुणीकडे वाहक असल्याची बतावणी केली. त्यानंतर आवारात थांबलेल्या एका बसमध्ये तिच्यावर गाडेनं बलात्कार केला होता. गाडेला पुणे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून ताब्यात घेतलं.

गाडेला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस चौकीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी गाडेसह शिवशाही बसचा चालक, वाहक यांचे जबाब नोंदविले आहे. गाडेची ससून रुग्णालयात डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. त्याच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

गाडे वापरत असलेला मोबाइल संच पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली. तांत्रिक तपासणीत गाडे आणि पीडित तरुणी एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे उघडकीस आलं आहे. गाडेने तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. तरुणीने त्याच्याकडे गयावया केली. त्यानंतर गाडेने तिला धमकावून बसमध्ये दोनदा बलात्कार केला होता. पोलिसांनी शिवशाही बस न्यायवैद्याक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) पाठविली असून, गाडेविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

दत्तात्रय गाडे याने पीडितेचा गळा दाबला. त्यामुळे ही तरुणी प्रचंड घाबरली. आपल्याला जिवंत सोडावे, यासाठी ही तरुणी दत्तात्रय गाडे याच्याकडे याचना करु लागली. याचाच फायदा घेऊन दत्तात्रय गाडे याने तरुणीवर अत्याचार केले.

Technical analysis revealed that the Swargate rape victim was not in contact with the accused

महत्वाच्या बातम्या