MLA Suresh Dhas : आमदार सुरेश धस यांना सहआरोपी करण्याची बीडमध्ये जनआक्रोश मोर्चात मागणी

विशेष प्रतिनिधी

बीड : MLA Suresh Dhas आमदार सुरेश धस आरोपीस वाचवण्यासाठी उघड सहकार्य करत असल्याचे दिसून येत असताना त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी बीडच्या शिरूर कासार येथील जनआक्रोश मोर्चात करण्यात आली.MLA Suresh Dhas

ढाकणे कुटुंबावरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज शिरूर कासार येथे बंद पाळत मोर्चा काढण्यात आला . सतीश भोसलेला अटक करण्याची आणि एसआयटी चौकशी करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांकडून केली जात आहे. आरोपीला वाचवण्यात आमदार सुरेश धस यांचा सहभाग असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. या मोर्चात शेकडो लोक सहभागी झाले असून सहा मागण्या करण्यात आल्या आहेत.

बीडच्या शिरूरकासार येथील सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील तो अद्याप फरार आहे. ढाकणे कुटुंबाच्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि खोक्याला तात्काळ अटक करा, या मागणीसाठी आज शिरूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच येथील पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शेकडो लोक सहभागी झाले आहेत. या मोर्चामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या सह अनेक जन सहभागी झाले आहेत. सकाळी 9 वाजता हा आक्रोश मोर्चा निघाला आहे. आरोपीला वाचवणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांना सहआरोपी करा, अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी केली आहे. या मोर्चात एकूण सहा मागण्या करण्यात आल्या.

या मोर्चात ढाकणे कुटुंबीयही सहभागी झाले होते. यावेळी महेश ढाकणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सतीश भोसलेची एसआयटी चौकशी करा. आम्हाला राहायची भीती वाटते रात्रभर झोप येत नाही. माझ्या वडिलांचे दात पडलेत, माझा पाय फॅक्चर झालाय. त्याने कमीत कमी 200 हरणं मारले आहेत. त्यामुळे त्याची SIT चौकशी व्हायला पाहिजे. त्याला लवकरात लवकर अटक करा. आमच्या जीवाला पुन्हा धोका आहे. आम्हाला त्याबाबत काही माहिती नाही, पण सतीश भोसले आम्हाला मरण्याच्या अवस्थेत टाकून गेला होता. ज्या लोकांनी आमच्यावर हल्ला केला. त्या सगळ्यांना लवकरात लवकर अटक व्हावी. सतीश भोसले खड्डे करून काय काय पुरलं आहे याची चौकशी व्हावी. त्यादिवशी सुद्धा तो हरण मारून स्कार्पियो गाडीतून घेऊन गेला आहे, मी माझ्या डोळ्याने बघितल आहे.

दिलीप ढाकणे म्हणाले, मोर्चात सहभागी झालेल्या सगळ्यांचा मी आभारी आहे, आम्हाला एवढं मारलं याचा आम्हाला कमी दुःख आहे. मला सगळ्यात जास्त दुःख आहे हरिण मारल्याचं. मी त्यांना आडवा गेलो म्हणून मला एवढं मारलं. मानवावर एवढा हल्ला करतात तर मुक्या प्राण्यावर कसा हल्ला करत असतील याचा विचार करा. आमची एकच मागणी आहे या सर्व आरोपींना कडक शासन झालं पाहिजे.

Demand to make MLA Suresh Dhas a co-accused in Jan Aakrosh Morcha in Beed

महत्वाच्या बातम्या