विशेष प्रतिनिधी
पुणे – पुणे महापालिकेने आषाढी वारीनिमित्त काही दिवसांसाठी पाणीकपात water cuts मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. पण दरम्यानच्या काळात पाऊस पडल्याने धरणांत ५८ टक्के पाणीसाठा जमा आहे .पण आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बुधवारपासून पुन्हा शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
पुणे शहराला खडकवासला धरण साखळीतून पाणीपुरवठा केला जातो.या धरणातील एकूण पाणीसाठा चार अब्ज टीएमसी कमी झाला होता. त्यामुळे तातडीने पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महापालिकेने १५ जूनपासून शहरात सम-विषम तारखांनुसार पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. त्याशिवाय बांधकामासाठी पाणी न वापराने, वॉशिंग सेंटर्स बंद करणे आदी नियम लागू केले गेले.त्यामुळे काही प्रमाणात पाण्याची बचत ही झाली होती.दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ७ ते १२ जुलैदरम्यान पाणीकपात रद्द करण्यात आली होती.
CM Fadanvis : अजितदादांच्या पुण्यतिथीआधी अपघाती निधनाचा अंतिम अहवाल, मुख्यमंत्र्यांची माहिती
दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत १६.८९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. त्यामुळे पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे शहरात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले.
यंदा शहरात गेल्या आठवड्यात जोरदार बरसलेल्या पावसाने आठवडाभरापासून विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यामध्येही पावसाचा जोर ओसरला असून, अधूनमधून हलक्या सरी हजेरी लावत आहेत. घाट माथ्यावर मध्यम पाऊस पडतो आहे. तापमानातही वाढ झाली आहे. अनुकूल वातावरण नसल्याने पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता नसून, दुपारनंतर आकाश ढगाळ राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. महिनाअखेरीस पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा एकूणच पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याने पाणीकपातीचे पुणेकरांवरील संकट कायम राहणार असल्याचे चित्र सध्या दिसते आहे.
Pune residents, use water judiciously; water cuts to be imposed in the city again.
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा