Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

पुणे

पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावर महिला चालवणार मेट्रो

शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.पुणे मेट्रोकडे शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणून पाहिले जात आहे. अशातच पुणे महामेट्रोकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.पुणे मेट्रोच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर १०० महिला मेट्रो पायलट नियुक्त करण्यात येणार असून, संपूर्ण मेट्रो संचालनची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर असणार आहे.

पुणे

फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा मुलालाही फायदा? CBIकडून चौकशी सुरू

लातूरमधील नीट पेपरफुटी प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्या मुलाची पुण्यातील सीबीआय कार्यालयात चौकशी सुरू असून, त्यालाही फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मुंबई, पुणे, महाराष्ट्र

२०२९ साठी राष्ट्रवादीची मोठी तयारी; प्रशांत किशोरांकडे रणनीतीची धुरा?

पुढील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि २०२९ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘ डिझाईन बॉक्स ‘ या कंपनीनंतर नवीन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले जाणार आहे.

पुणे

वीजबिलातून दिलासा! पुण्यात सौरऊर्जेसाठी केंद्र-राज्य सरकारचे अनुदान; कुणाला किती अनुदान मिळणार?

विशेष प्रतिनिधी पुणे : वीजबिलाचा वाढता खर्च कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना सौरऊर्जेकडे वळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मोठी संधी उपलब्ध

Uncategorized, पुणे

पुणे विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी; महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यता

राज्यातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील एकूण १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून त्यापैकी १६ जागांसाठी नियमित निवडणूक, तर एका ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Sangram Jagtap
महाराष्ट्र

Sangram Jagtap : या झुरळांना हिंदुत्ववादी लोकांनी घाबरू नये, आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन

पोलिस प्रशासनाला आजच सांगतो, 26 तारखेला बैल कापला गेला तर 27 तारखेला इथे आम्ही येऊ, असा इशारा देत आमदार संग्राम जगताप यांनी या झुरळांना हिंदुत्ववादी लोकांनी घाबरू नये असे आवाहन केले.

Murshidabad
देश-विदेश

Murshidabad : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आश्रमाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटातील दोन आरोपींना बोरीवलीतून अटक

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील एका आश्रमाबाहेर झालेल्या बॉम्ब हल्यातील फरार आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बोरीवली परिसरातून अटक केलीय. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच 14 मे रोजी ही हादरवून टाकणारी घटना घडली होती. याप्रकरणी बहरामपूर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

BMC
मुंबई

BMC : मुंबई महापालिकेतील 79 नगरसेवकांच्या निवडीला आव्हान! न्यायालयात याचिका दाखल

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात एक मोठी माहिती समोर आली असून, थेट 79 नगरसेवकांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यातील अनेक याचिका सध्या न्यायप्रविष्ट असून काही प्रकरणांवर सुनावणी देखील सुरू आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधींच्या निवडीविरोधात आक्षेप घेतले गेल्यामुळे संपूर्ण मुंबई महापालिका निवडणूक प्रक्रियेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Transport Minister
मुंबई

Transport Minister : लालपरीचा प्रवास महागणार? डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर वार्षिक 124 कोटींचा अतिरिक्त भार, परिवहन मंत्र्यांकडून भाडेवाढीचे संकेत

जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या तणावाचा फटका आता सर्वसामान्यांची वाहिनी असलेल्या ‘एसटी बस’ला बसण्याची शक्यता आहे. देशातील इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या तिकिटात वाढ होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत परिवहन मंत्र्यांनी भविष्यातील तिकीट दरवाढीचे स्पष्ट संकेत दिले आहेत; मात्र ही भाडेवाढ तातडीने लागू होणार नसल्याने प्रवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

पुणे

पुणे विभागाची स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

पुणे

अटकेनंतर आता मनीषा मांढरेंचं महाविद्यालयाकडून निलंबन !

नीट पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या मनिषा मांढरे यांना निलंबीत करण्यात आले आहे. पुण्यातील मॉडर्न कॉलेज प्रशासनाकडून मनिषा मांढरे यांचे निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.महाविद्यालयात झालेल्या बैठकीत मांढरे यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे, महाराष्ट्र

राष्ट्रवादीत पुन्हा अंतर्गत कलह? अजित पवारांविषयी कथित ऑडिओ क्लिपवरून नवा वाद

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत संघर्ष उफाळून आल्याचे चित्र समोर येत आहे. पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांविषयी पक्षातीलच दोन वरिष्ठ नेते अत्यंत खालच्या भाषेत बोलत असल्याची कथित ऑडिओ क्लिप अस्तित्वात असल्याचा दावा केला आहे.