फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा मुलालाही फायदा? CBIकडून चौकशी सुरू

विशेष प्रतिनिधी

पुणे: लातूरमधील नीट पेपरफुटी प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्या मुलाची पुण्यातील सीबीआय कार्यालयात चौकशी सुरू असून, त्यालाही फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मोटेगावकरच्या मुलासोबत आरसीसी क्लासमधील आणखी तीन विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांचीही चौकशी करण्यात येत आहे.

शिवराज मोटेगावकर याच्या मुलाची पुण्यातील सीबीआय कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे, शिवराज मोटेगावकरच्या मुलाने बारावीची परीक्षा दिली आहे आणि, त्यालाही फुटलेल्या नीट प्रश्नपत्रिकाचा फायदा झाल्याचा बोललं जात आहे. शिवराज मोटेगावकरच्या मुलासोबत शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या आणखी तीन विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसह सीबीआय ऑफीसमध्ये चौकशी केली जात आहे.



मोटेगावकरच्या मुलांसोबत वकील..

शिवराज मोटेगावकरच्या मुलासोबत दोन ते तीन वकील सुद्धा आहेत.शिवराज मोटेगावकरच्या मुलाने आत्ताच १२ ची परीक्षा दिली आहे,त्यामुळे तो अल्पवयीन असल्याने त्याचसोबत वकील असल्याचे सांगितले जात आहे. आरसीसी क्लासेस मध्ये शिक्षण घेणारे काही विद्यार्थी आणि त्यांचे पालक देखील शिवराज मोटेगावकरच्या मुलासोबत चौकशीसाठी हजर आहेत.शिवराज मोटेगावकरच्या बँक खात्यात पालकांकडून करण्यात आलेले आर्थिक व्यवहार देखील आढळून आले आहेत.संबंधित विद्यार्थ्यांना देखील चौकशीसाठी पुण्यातील सीबीआय कार्यालयात बोलवण्यात आले आहे.शिवराज मोटेगावकरचा मुलगा आणि तीन विद्यार्थी सोबत त्यांच्या पालकांची चौकशी सीबीआय कार्यालयात सुरू आहे.

शिवराज मोटेगावकरने त्याचा मुलासाठी नीट पेपर फोडल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.शिवराज मोटेगावरकच्या मुलाने यावर्षीच १२ वी उत्तीर्ण केली आहे,सोबतच नीटचा पेपर देखील दिला आहे.मोटेगावकरला एमबीबीएस कॉलेज सुरू करण्याचे स्वप्न त्याच्या मुलाच्या माध्यमातून साकार करायचे होते,अशी चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे.

Did the torn question paper also benefit Motegaonkar’s son? CBI begins investigation..

महत्वाच्या बातम्या