विशेष प्रतिनिधी
पुणे: नीट पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेल्या मनिषा मांढरे यांना निलंबीत करण्यात आले आहे. पुण्यातील मॉडर्न कॉलेज प्रशासनाकडून मनिषा मांढरे यांचे निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.महाविद्यालयात झालेल्या बैठकीत मांढरे यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मनिषा मांढरे या पेपरफुटी प्रकरणात दोषी आढळून आल्यानंत,ज्या ठिकाणी त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या त्या मॉडर्न कॉलेजकडून एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत मांढरे यांच्या निलंबनांवर कॉलेज प्रशासनाकडून चर्चा करण्यात आली,अखेर चर्चेनंतर मांढरे यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मनिषा मांढरे यांनी केलेला प्रकार हा शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा आहे,त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात येत असल्याचे पत्र मॉडर्न कॉलेजकडून काढण्यात आले आहे.मनिषा मांढरे यांना सीबीआयकडून अटक करण्यात आले असून त्यांची आता कसून चौकशी सुरू आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणात आत्तापर्यंत कोण कोण अटकेत?
पी.व्हि कुलकर्णी,निवृत्त केमिस्ट्री प्राध्यापक आणि या पेपरफुटीचे मास्टरमाइंड
मनिषा मांढरे, बायलॉजी प्राध्यापिका आणि ‘ नीट ‘ प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनल मध्ये सहभाग
शिवराज मोटेगावकर, केमिस्ट्री क्लासेस संचालक आणि पेपर कुठे रॅकेट मध्ये महत्त्वाची भूमिका
शुभम खैरनार, बीएचएमएस विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना जाळत अडकवून लाखोंच्या व्यवहार करून घेणे
मनिषा वाघमारे, ब्युटी पार्लर चालक आणि विद्यार्थ्यांना शोधून सूत्रधारांपर्यंत पोहोचव
धनंजय लोखंडे,डॉक्टर आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना सूत्रधारापर्यंत पोहचवणे
After arrest, Manisha Mandhare has now been suspended from the college!
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा