Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Maharashtra
मुंबई

Maharashtra : राज्यातील 31 आयपीएस अधिकार्‍यांची बदली; चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, तर 27 उपायुक्तांचा समावेश

राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्याचे सत्र सुरूच असून गृहविभागाने राज्यातील अन्य 31 आयपीएस अधिकार्‍यांची बदली केली आहे. त्यात चार अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह 27 पोलीस उपायुक्त-अधिक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांचा समावेश आहे. एका पोलीस अधिक्षकाला अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली आहे.

Deonar
मुंबई

Deonar : पश्चिम बंगाल बॉम्बस्फोट प्रकरणातील तीन आरोपींना मुंबईतील देवनार मधून अटक

पश्चिम बंगालमधील गोळीबार आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपींना मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंडीतील देवनार परिसरातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये मुख्य सूत्रधाराचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Arju Bishnoi gang
देश-विदेश

Arju Bishnoi gang : रावेत गोळीबार प्रकरणी आरजू बिष्णोई गॅंगच्या तिघांना उत्तराखंड येथून अटक

रावेत येथील एका फर्निचर मॉलवर गोळीबार केल्याप्रकरणी आरजू बिष्णोई आणि कुलदीप कशिश गॅंगच्या तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने उत्तराखंड येथून अटक केली. या आरोपींनी रावेत येथील ए जे फर्निचर मॉलवर आठ गोळ्या झाडल्या होत्या. दोन कोटींच्या खंडणीसाठी हा गोळीबार केल्याचे तपासात उघडकीस आले असून या घटनेचा संबंध लॉरेन्स बिष्णोई गॅंगशी जोडला जात आहे.

Krishna Andekar
पुणे

Krishna Andekar : बालाजीनगर गोळीबार प्रकरणी बंडू आणि कृष्णा आंदेकर यांच्यासह 12 जणांवर गुन्हा

शहरातील बालाजीनगर परिसरात बुधवारी सकाळी भरदिवसा रिक्षाचालकावर गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तब्बल १२ जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shivraj Motegaonkar
महाराष्ट्र

Shivraj Motegaonkar : हजारावर विद्यार्थ्यांना विकले पेपर, शिवराज मोटेगावकरचा मुलगाही चौकशीसाठी ताब्यात

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी घोटाळ्यात आता नागपूर कनेक्शन समोर आहे. या रॅकेटचा नांदेड पॅटर्न तपासताना सीबीआयच्या रडारवर आता नागपूर येथील ‘आलोक’ नावाचा संशयित मास्टरमाइंड आला आहे. या आलोकनेच किमान एक हजार विद्यार्थ्यांना नीटचा पेपर विकल्याचा दाट संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला आहे.तर दुसरीकडे, याच नामांकित ‘आरसीसी क्लासेस’चे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकरच्या मुलालाही चौकशीसाठी सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

Ashok Kharat case
महाराष्ट्र

भोंदू अशोक खरात प्रकरण : खरात ईडीच्या ताब्यात, चौकशीसाठी मुंबईला

नाशिकमधील भोंदू बाबा म्हणून चर्चेत असलेल्या    अशोक खरात   याच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई सुरू केली आहे. ईडीने खरातला नाशिक मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेत मुंबईला नेले असून, त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. लैंगिक शोषण, फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगसंदर्भातील आरोपांवरून ही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Gulabo Gang
पुणे

Gulabo Gang : कोरेगाव पार्क अत्याचारप्रकरणी गुलाबो गॅंग आक्रमक, महिला सुरक्षेसाठी वाढीव गस्तची मागणी

कोरेगाव पार्क – मुंढवा रोड परिसरात एका महिलेवर कारमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर गुलाबो गॅंग आणि बिटिया फाउंडेशनच्या वतीने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

Modern College
पुणे

Modern College : मॉडर्न महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याच्या मागणीवर कर्मचाऱ्यांचा निषेध

नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याची मागणी काँगेसने पुणे महापालिकेच्या सभागृहात केली होती. यावर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कोणतीही संपूर्ण माहिती न घेता ही मागणी करण्यात आल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत याचा निषेध केला.

BJP-NCP
पुणे

BJP-NCP : पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी भाजप-राष्ट्रवादीत थेट चुरस; ‘७ मतांची आघाडी’चा भाजपचा दावा

पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद जागेसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय चुरस तीव्र होत चालली आहे. स्थानिक आघाड्यांचा पाठिंबा आणि शहरी भागातील वर्चस्व यांच्या जोरावर राष्ट्रवादीपेक्षा सात मते अधिक असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ही प्रतिष्ठेची जागा मिळवण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींवर दबाव वाढवला जात आहे.

Cheese analogue
मुंबई

Cheese analogue : चीज ॲनालॉग’चा उल्लेख बंधनकारक; राज्यभर विशेष तपासणी मोहीम

हॉटेल्स, उपाहारगृहे, भोजन व्यवस्था पुरवठादार तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना विक्री पावती, मेन्यू कार्ड आणि दर फलकांवर ‘चीज ॲनालॉग’चा स्पष्ट उल्लेख करणे आता बंधनकारक करण्यात आले असून अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व विभागीय अन्न सहआयुक्तांना दिले आहेत.

Shivraj Motegaonkar
मुंबई

Shivraj Motegaonkar : आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्येच सापडली लीक झालेली नीट प्रश्नपत्रिका

आरसीसी क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्येच लीक झालेली नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका आढळून आल्याने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांना नीट पेपरफुटी प्रकरणात अटक केली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयने मोटेगावकर यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतली असता त्यांच्या मोबाईलमध्ये नीटची लीक झालेली प्रश्नपत्रिका सापडली. तपास यंत्रणांच्या मते, मोटेगावकर हे थेट नीट पेपरफुटी रॅकेटमध्ये सहभागी होते आणि परीक्षा होण्याच्या जवळपास दहा दिवस आधीच त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका पोहोचली होती.

'Motegaonkar
पुणे

‘Motegaonkar : नीट घोटाळ्यातील‘मोटेगावकर क्लास’वर महापालिकेची कारवाई; इमारत सील करण्याचे आदेश

डेक्कन परिसरातील अनधिकृत इमारतीत सुरू असलेल्या ‘मोटेगावकर क्लास’वर पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कठोर कारवाई करत इमारत सील करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन तसेच तब्बल ३ कोटी २० लाख रुपयांचा थकीत मिळकत कर असल्याचे उघड झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.