‘Motegaonkar : नीट घोटाळ्यातील‘मोटेगावकर क्लास’वर महापालिकेची कारवाई; इमारत सील करण्याचे आदेश

विशेष प्रतिनिधी

पुणे : Motegaonkar  डेक्कन परिसरातील अनधिकृत इमारतीत सुरू असलेल्या ‘मोटेगावकर क्लास’वर पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कठोर कारवाई करत इमारत सील करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन तसेच तब्बल ३ कोटी २० लाख रुपयांचा थकीत मिळकत कर असल्याचे उघड झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.Motegaonkar

शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या डेक्कन परिसरात संबंधित इमारत उभारण्यात आली असून ती अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी गेल्या चार वर्षांपासून क्लास सुरू असल्याची माहिती आहे. बांधकाम विभागाची परवानगी नसताना इतक्या काळ हा व्यवसाय सुरू राहिल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.Motegaonkar



या इमारतीवर ३ कोटी २० लाख रुपयांचा मिळकत कर थकीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, हजारो विद्यार्थी उपस्थित राहत असतानाही इमारतीकडे अग्निशमन विभागाचे अनिवार्य ‘फायर एनओसी’ नसल्याचे निदर्शनास आले. संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी तातडीने इमारत सील करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, या क्लासमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालकांनी मोठ्या प्रमाणावर फी भरलेली असून, क्लास अचानक बंद झाल्यास पुढील शिक्षणाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामांमध्ये सुरू असलेल्या व्यावसायिक वापरावर लक्ष ठेवण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. शहरात सुमारे ६ हजार ५०० खासगी क्लास चालक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या खासगी क्लास चालकांवर तसेच त्यांचे क्लास असलेल्या इमारतीची महापालिकेने तपासणी करण्याची मागणी देखील केली जाऊ लागली आहे.

PMC orders sealing of ‘Motegaonkar Classes’ building in NEET scam case

महत्वाच्या बातम्या