BJP-NCP : पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी भाजप-राष्ट्रवादीत थेट चुरस; ‘७ मतांची आघाडी’चा भाजपचा दावा

विशेष प्रतिनिधी

पुणे : BJP-NCP पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद जागेसाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय चुरस तीव्र होत चालली आहे. स्थानिक आघाड्यांचा पाठिंबा आणि शहरी भागातील वर्चस्व यांच्या जोरावर राष्ट्रवादीपेक्षा सात मते अधिक असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ही प्रतिष्ठेची जागा मिळवण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींवर दबाव वाढवला जात आहे.BJP-NCP

भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३४७ जागा असून ग्रामीण भागात त्यांची मजबूत पकड आहे. तर भाजपकडे ३१९ जागा असून शहरी भागात त्यांचे वर्चस्व असल्याचे सांगितले जाते. याशिवाय दौंड, शिरूर, भोर आणि इंदापूर येथील स्थानिक आघाड्या भाजपच्या बाजूने असल्याने त्यांचे पारडे जड झाल्याचा दावा केला जात आहे.BJP-NCP



दुसरीकडे, बारामती, इंदापूर, चाकण आणि जेजुरी या नगरपरिषदांमध्ये राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. विशेषतः बारामती नगरपरिषदेत ३६ जागा जिंकत राष्ट्रवादीने एकतर्फी विजय मिळवला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात राष्ट्रवादीची ताकद अजूनही निर्णायक मानली जात आहे.

इतर पक्षांची उपस्थिती मर्यादित असली तरी अंतिम समीकरणांवर त्यांचा प्रभाव राहणार आहे. शिवसेना (शिंदे गट) राजगुरुनगर आणि सासवडमध्ये प्रतिनिधित्व राखून आहे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नाही. काही ठिकाणी अपक्षांचे वर्चस्व असल्याने अंतिम टप्प्यात त्यांच्या भूमिकेचे महत्त्व वाढणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीकडे सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रीत केले असून उमेदवारीसाठी दोन्ही पक्षांत इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील चढाओढीबरोबरच राज्य पातळीवरील महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपावरच अंतिम निर्णय अवलंबून राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेना (शिंदे गट): राजगुरुनगर (१० जागा) आणि सासवड (८ जागा) मध्ये आहेत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट): पुणे महानगरपालिका, लोणावळा आणि राजगुरुनगरमध्ये अल्प यश. काँग्रेसला पुणे महापालिकेत १५ जागावर मर्यादित आहे. शिरूर, लोणावळा आणि तळेगाव दाभाडे भागात अपक्षांचे वर्चस्व आहे.

अंतिम निर्णय राज्याच्या जागावाटपावर?

विधानपरिषदेच्या या निवडणुकीवर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. भाजपमधील पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक नेते या जागेवर आक्रमकपणे दावा सांगत आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे प्राबल्य ग्रामीण भागात जास्त असले, तरी त्यांच्याकडूनही इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या जागेचा अंतिम निर्णय राज्य पातळीवरील महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या सूत्रावरच होण्याची दाट शक्यता आहे.

Direct BJP-NCP battle for Pune Legislative Council seat; BJP claims 7-vote lead

महत्वाच्या बातम्या