Krishna Andekar : बालाजीनगर गोळीबार प्रकरणी बंडू आणि कृष्णा आंदेकर यांच्यासह 12 जणांवर गुन्हा

विशेष प्रतिनिधी

पुणे : Krishna Andekar  शहरातील बालाजीनगर परिसरात बुधवारी सकाळी भरदिवसा रिक्षाचालकावर गोळीबार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तब्बल १२ जणांविरोधात खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Krishna Andekar

कृष्णा आंदेकर, बंडु आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमित बहादुरकर, स्वप्नील बहादुरकर यांच्यासह निधेश विंचुरकर, वेदांत टेमगिरे, आवेज आशफाक शेख, ऋषी आंबट, लाला उर्फ अमन आणि अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1) निदेश अमोल विंचुरकर, वय 15, रा. 238, नाना पेठ, अशोक चौक, पुणे
2) आफ्ताफ शरीफ सय्यद, धंदा. एसी काम, रा. भाग्यदेव नगर, वैशाली नर्सिंग होम, कोंडवा खुर्द.
3) ऋषी प्रसाद मोहन आंबट, वय 21, धंदा. हमाल, रा. तालीम, नाना पेठ, नवरंग मित्र मंडळ जवळ, पुणे.
4) आवेज अशपाक शेख, वय 26, धंदा. मासे विक्री, रा. 271, गणेश पेठ,
5) वेदांत श्रीनिवास टेमगिरे, वय 19, रा. 60 भवानी पेठ, पालखी विठोबा चौक, पुणे
6) अमन फारूक बागवाले, वय 21, रा. गोल्डन ग्रेस, भवानी पेठ जवळ, पुणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.



या प्रकरणी अक्षय मस्के यांच्या पत्नी करुणा मस्के यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी अक्षय उर्फ बाळु बापु मस्के (वय 26, रिक्षाचालक, रा. आंबेगाव पठार) हे बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या एमएच-12 आरपी 2841 क्रमांकाच्या रिक्षासह राजश्री शाहू बँक चौक, बालाजीनगर येथे आले होते. त्यावेळी आरोपींनी पूर्वनियोजित गुन्हेगारी कट रचून त्यांच्यावर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने वार केले तसेच पिस्तुलातून गोळ्या झाडून गंभीर जखमी केले.पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मयत वनराज आंदेकर याच्या टोळीशी संबंधित वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. जखमी अक्षय मस्के यांना तातडीने भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखेचे अधिकारी, सहकारनगर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 204/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमांसह हत्यारबंदी कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Balajinagar firing case: FIR filed against 12, including Bandu and Krishna Andekar

महत्वाच्या बातम्या