विशेष प्रतिनिधी
पुणे : Modern College नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याची मागणी काँगेसने पुणे महापालिकेच्या सभागृहात केली होती. यावर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कोणतीही संपूर्ण माहिती न घेता ही मागणी करण्यात आल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत याचा निषेध केला.Modern College
महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे असे स्पष्ट केले आहे की, संस्थेत सुमारे ६०० कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या कुटुंबियांसह जवळपास २४०० लोकांचे उपजीविकेचे साधन या महाविद्यालयाशी जोडलेले आहे. अशा परिस्थितीत मान्यता रद्द करण्याची मागणी म्हणजे शेकडो कर्मचाऱ्यांना बेरोजगार करण्यासारखी असून ही भूमिका बेजबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.Modern College
तसेच महाविद्यालयात सुमारे १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, अशा मागण्यांमुळे त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळ करणारी ही मागणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणात संबंधित शिक्षिकेची नियुक्ती नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) गोपनीय स्वरूपात करण्यात आलेली असते. संबंधित शिक्षिकेच्या जबाबदाऱ्यांबाबत महाविद्यालयाला माहिती नसते, असेही कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात संस्थेकडून यापूर्वीच स्पष्टीकरण देण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या मागणीच्या निषेधार्थ महाविद्यालयातील कर्मचारी संत ज्ञानेश्वर पादुका चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता येथे एक तासाचे ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाची संबंधितांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.
Employees protest demand to cancel Modern College recognition
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा