Gulabo Gang : कोरेगाव पार्क अत्याचारप्रकरणी गुलाबो गॅंग आक्रमक, महिला सुरक्षेसाठी वाढीव गस्तची मागणी

विशेष प्रतिनिधी

पुणे : Gulabo Gang  कोरेगाव पार्क – मुंढवा रोड परिसरात एका महिलेवर कारमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर गुलाबो गॅंग आणि बिटिया फाउंडेशनच्या वतीने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.Gulabo Gang

या निवेदनाद्वारे संबंधित प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. गुलाबो गॅंगच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांची भेट घेत महिलांच्या सुरक्षेबाबत विविध मागण्या मांडल्या.Gulabo Gang



यावेळी रात्रीच्या वेळेस पोलीस गस्त वाढविणे, महिला पोलीस गस्त पथकांची संख्या वाढविणे, संवेदनशील भागांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था उभारणे तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

“पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रशासनाने केवळ आश्वासने देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करून द्यावे,” अशी भूमिका संगीता तिवारी यांनी व्यक्त केली.

या वेळी गुलाबो गॅंगच्या शोभा पणीकर, सुवर्ण माने, भारती लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला असून, सामाजिक संघटनांकडून प्रशासनावर दबाव वाढविला जात आहे.

Gulabo Gang turns aggressive over Koregaon Park assault case, demands increased patrolling for women’s safety

महत्वाच्या बातम्या