विशेष प्रतिनिधी
पुणे : वीजबिलाचा वाढता खर्च कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना सौरऊर्जेकडे वळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.
महावितरणच्या पुणे परिमंडलात ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना’ आणि ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजना’ अंतर्गत तब्बल ३७ हजार ७७२ ग्राहकांना कमी खर्चात सौरऊर्जा प्रकल्प बसविता येणार आहे.
मे महिना ‘सोलार महिना’ म्हणून साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्त ही विशेष योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना केवळ अडीच हजार ते दहा हजार रुपयांत एक किलोवॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसविता येणार असून, पुढील २५ वर्षे मोफत वीजेचा लाभ मिळू शकतो.
योजनेचा लाभ दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना दिला जाणार आहे. विशेषतः दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, अनुसूचित जाती-जमातीतील नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे.
एक किलोवॉट सौरऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ३० हजार रुपयांचे तर राज्य सरकारकडून १७ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अत्यल्प रक्कम भरून प्रकल्प बसविता येणार आहे.
कोणाला किती अनुदान आणि किती खर्च?
दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी : फक्त २,५०० रुपये anudan
अनुसूचित जाती-जमातीतील ग्राहक : ५,००० रुपये अनुदान
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : १०,००० रुपये अनुदान
महावितरणकडून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर योजना राबविली जात आहे. इच्छुक ग्राहकांनी ‘पीएम सूर्यघर’ ॲप किंवा महावितरणच्या iSMART पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Relief from electricity bills! Central-state government subsidy for solar energy in Pune; How much subsidy will be given to who?
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा