Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Ravindra Binawade
पुणे

Ravindra Binawade : ई-रजिस्ट्रेशनमुळे गेल्या पाच वर्षांत ३१ हजार ७८५ दस्तावेजांची नोंदणी, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांची माहिती

पुणे : Ravindra Binawade : ई-रजिस्ट्रेशनमुळे नोंदणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर झाली असून गेल्या पाच वर्षांपासून याची यशस्वीपणे अंमलबजावणी होत आहे . आजअखेर एकूण ३१ हजार ७८५ दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्री. रवींद्र बिनवडे यांनी दिली.

Ramdas Kadam
महाराष्ट्र

Ramdas Kadam : “मी जर तोंड उघडले, तर मातोश्री कापेल, मोठा हादरा बसेल ” – रामदास कदम

मुंबई : Ramdas Kadam : उद्धव ठाकरे दिसतात तसे नाहीत. ते कपटी आहेत. मी 54 वर्षे शिवसेनेत घालवली आहेत, मी का खोटे बोलणार? उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत असेल, तर त्यांनी समोर येऊन सांगावे की मी जे बोलतोय, ते खरे नाही. जर मी तोंड उघडले, तर उद्धव ठाकरेंची खूप अडचण होईल आणि त्यांचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर येईल, अशी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

Chandrakant Patil
महाराष्ट्र

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या दाव्यामुळे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर वादात नवा ट्विस्ट ?

सांगली : Chandrakant Patil : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील शाब्दिक वाद आता सर्वपरिचित झाला आहे. सांगलीत झालेल्या इशारा सभेनंतर आता उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांनी आपल्याला फोन केल्याचा दावा केला आहे.

Uddhav Thackeray
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : हिंदुत्वाऐवजी उद्धव ठाकरेंकडून खानाच्या पिलावळीचा उदोउदो, नवनाथ बन यांचा जोरदार प्रहार

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून सतत हिंदुत्वावर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर, भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याखेरीज दुसरे काहीही केले नाही. केवळ सोनिया आणि राहुल गांधी यांची भाषा शिवतीर्थावरून दसरा मेळाव्यात ऐकायला मिळाली. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा वैचारिक वारसा खुलेआम सोडून देत त्यांचेच पूत्र उद्धव ठाकरे यांनी खानाच्या पिल्लावळीचे विचार पेरण्याचे काम केले. शिवतीर्थावरच बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ आहे. कालचे त्यांचे विचार ऐकून बाळासाहेबांच्या आत्म्याला अतीव दु:ख झाले असणार, असा प्रहार भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला.

Bapusaheb Pathare
पुणे

Bapusaheb Pathare : आमदार पुत्राचे दसऱ्याला होणारे सीमोल्लंघन का टळले ? काय म्हणाले शहर प्रमुख..

पुणे : Bapusaheb Pathare : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षातून (भाजप) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलेले बापू पठारे यांनी वडगाव शेरी मतदारसंघातून विजय मिळवला. विरोधी पक्षात असणारे बापू पठारे यांचे सत्ताधारी महायुतीशी असलेले ऋणानुबंध लपून राहिलेले नाहीत. त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू आहे. यावर आता भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : उध्दव ठाकरेंनी वाचवले माझे हजार रुपये : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टाेला

मुंबई : Devendra Fadnavis : दसरा मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना टाेला मारला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना विकासाबाबत एक तरी मुद्दा मांडावा, असे आव्हान दिले हाेते. ठाकरेंनी भाषणात एकही मुद्दा मांडला नाही.

मुंबई

Sanjay Raut : त्यांच्या तोंडामध्ये कोणीतरी शेण कोंबलं असेल , रामदास कदम यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांचा प्रतिहल्ला

त्यांच्या तोंडामध्ये कोणीतरी शेण कोंबलं असेल आणि त्या भीतीपोटी ते काहीतरी उगाळत असतील तर तुम्ही काय करणार? असा प्रतिहल्ला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाच्या वक्तव्यावर केला आहे.

Amit Satam
महाराष्ट्र

Amit Satam : उद्धव ठाकरेंचे भाषण सडकं आणि नासलेलं, अमित साटम यांचा घणाघात

उद्धव ठाकरेंचे भाषण सडकं आणि नासलेलं हाेतं. हिंदुत्व सोडल्यानंतर गर्दी कशी कमी होते, याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले, असा घणाघात मुंबई प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित साटम यांनी केला आहे.

Ramraje
महाराष्ट्र

Ramraje : मनोमिलन एकतर्फी प्रेमातून होत नाही : रामराजेंचा रणजीत नाईक निंबाळकर यांना इशारा

मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल. राजकारण करायचं असेल तर विचार करावा लागेल, असा इशारा विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांना दिला आहे.

NDA in Bihar
देश-विदेश

NDA in Bihar : बिहारमध्ये एनडीएसाठी धोक्याची घंटा: तेजश्री यादव, प्रशांत किशोर यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी धोक्याची घंटा वाजत आहे. सी व्होटर सर्व्हे नुसार माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि नव्याने स्थापन झालेल्या रणनितीकर प्रशांत किशोर यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे.

President Putin
देश-विदेश

President Putin : तुम्हालाच परिणाम भोगावे लागतील, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा अमेरिकेला इशारा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेवर भारत आणि चीनला ऊर्जा संबंध तोडण्याचा दबाव टाकल्याबद्दल जोरदार हल्लाबोल केला. पुतिन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की अशा दबावाच्या हालचालींचे आर्थिक परिणाम उलट अमेरिकेलाच भोगावे लागतील.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी ,: राज ठाकरे यांच्याशी युतीवर उध्दव ठाकरे यांचे स्पष्टीकरण

मी आणि राज एकत्र येणार का? असे कुणीतरी बोलले. मग आम्ही पाच जुलै रोजी काय केले? तेव्हा मी बोललो आहे, आम्ही एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल, तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडून देणार नाही, असे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युती होणार असल्याचे स्पष्ट केले.