‘हैदराबाद गॅझेट’ची अंमलबजावणी सुरु असतानाच 70 हजार मराठा विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात
मराठा आरक्षणाचा विषय गाजत असताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असलेल्या सारथी संस्थेबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मराठा आरक्षणाचा विषय गाजत असताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असलेल्या सारथी संस्थेबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे.
बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली. पोलिसांना सहकार्य केले नसल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली. मात्र, घरी नोटीस देण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत अत्यंत भयानक प्रकार घडला. पोलिसांच्या अंगावर चक्क कुत्रे सोडण्यात आले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ होत आहे. कॉंग्रेसमध्ये अशोक चव्हाणांना काय वनवास भोगावा लागला ?
नाशिक : Rohit Pawar : महायुती सरकार भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांवर कोणतीही कारवाई करत नाही. हे सरकार घमंडी झाले असून, त्याचा माज उतरवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार याच्या चर्चा महाराष्ट्रात सुरू झाल्या आणि मग गुजरातचे राज्यपाल असणाऱ्या देवव्रत यांच्यावर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हूणन अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) गुजरातमधील जामनगर येथील वनतारा या प्राणीसंग्रहालय व वन्यजीव पुनर्वसन केंद्राला मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जस्ती चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने आपल्या अहवालात वनतारामध्ये सर्व नियमांचे काटेकोर पालन होत असल्याचे नमूद केले आहे.
मुंबई : Acharya Devvrat : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी पदाची शपथ घेतली आहे. राजभवनात साेमवारी झालेल्या या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रीमंडळातील अनेक मान्यवर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी आचार्य देवव्रत यांना पदाची शपथ दिली.
काल झालेल्या क्रिकेटच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चांगलाच पराभव केला आहे. परंतु विरोधी पक्षनेत्यांनी मात्र हा देशद्रोह असल्याचा सुर लावून धरला आहे. आज भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरून विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.
भारतीय नौदलासाठी अभिमानाचा क्षण ठरलेला देशात बनलेला पहिला प्रवासी ड्रोन ‘वरूण 100’ आता अधिकृतपणे चर्चेत आला आहे. पुण्यातील चाकण येथे स्थित सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या भारतीय कंपनीने विकसित केलेल्या या मानवरहित हवाई वाहनाची (Passenger Drone) चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. आपत्कालीन बचावकार्य, वाहतूक आणि लष्करी गरजांसाठी या ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे.
Sanjay Raut: भारत – पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा फिक्सिंग मॅच असून यातून दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेला असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे
उमरगा तालुक्यातील नाईक नगर तांडा येथील एका 32 वर्षीय तरुणाने बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट नुसार एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना शनिवारी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे, पुणे शहरात रविवारी सायंकाळपासूनच सतत पाऊस पडत आहे. सोमवारी सकाळी देखील अनेक भागात पाऊस पडल्याने आता सखल भागात पाणी साचले आहे.