विशेष प्रतिनिधी
जळगाव :- जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाणे हद्दीत सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.जंगल परिसरात 40 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याचा आणि त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करून 14 आरोपींना अटक केली आहे.
देऊळगाव-कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील निर्जन जंगल परिसरात 2 जून रोजी 40 वर्षीय विवाहित महिला तिच्या मित्रासह फिरायला गेली होती,यावेळी लाकूड तोडीसाठी जंगलात फिरत असलेल्या तरुणांना पीडित महिला एका तरुणाच्या सोबत आढळून आली.यावेळी काही तरुणांनी तिला आणि तिच्या सोबतच्या तरुणाला धमक्या देत महिलेवर मित्रासमोरच दोन आरोपींनी जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला. ज्यावेळी ते अत्याचार करत होते त्यावेळी अन्य नराधमांनी त्याचा व्हिडीओ तयार केला. त्यांनतर ते तिथून निघून गेले. झालेला प्रकार या महिलेने कोणालाही सांगितला नाही.
मात्र त्यानंतर हा व्हिडीओ त्या नराधमांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हे महिलेच्या लक्षात येताच तिने तातडीने पोलिसात धाव घेतली. आपल्यासोबत झालेला प्रकार तिने पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला .याप्रकरणात पोलिसांनी 15 पैकी 14 आरोपींना अटक केली आहे.
एक प्रमुख आरोपी फरार
पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. सदर घटनेतील बलात्कार करणाऱ्या दोघा आरोपींपैकी एक प्रमुख आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडिता आणि संशयित आरोपी तरुण हे एकमेकांच्या परिचयातील असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय अशा घटना पूर्वी कोणासोबत ही घडल्या असतील तर त्यांनी पुढे येवून तक्रार करावी असे आवाहन ही केले आहे.
Jalgaon Shaken! 40-Year-Old Woman Gang-Raped; 14 Out of 15 Accused Arrested
महत्वाच्या बातम्या
- केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती
- राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा अखेर राजीनामा
- सुशिक्षित मुलांमध्ये सूडबुध्दी का निर्माण हाेतेय? केतन अग्रवाल प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचे भाष्य
- केतनला टक्कल असल्याने सियाला नव्हता पसंद, पाेलीस चाैकशीत कबुली