सिया गोयलचा भाऊ साहीलच्या आरोपानंतर आशुतोष श्रीवास्तव यांनी धाडली 10 कोटींच्या नुकसानभरपाईची नोटीस

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याप्रकरणाला आता एक वेगळेच कायदेशीर वळण मिळाले आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल हिचे वकील असल्याचा दावा करणारे अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी आता सियाचा भाऊ साहिल गोयल याला थेट 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे.

कोर्टातील नाट्यमय घडामोडींनंतर हा वाद आता चांगलाच पेटला आहे.सोमवारी आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी कोर्टात उभे राहून सियाच्या बाजूने युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांना अद्याप सियाचे अधिकृत वकीलपत्र मिळाले नव्हते. ही बाब गोयल कुटुंबियांना आधीपासूनच खटकत होती.



अखेर कोर्टासमोर बोलताना सिया गोयलने स्पष्ट केले की, “माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत.” सियाच्या या थेट खुलाशानंतर अ‍ॅड. श्रीवास्तव यांचा चांगलाच संताप झाला आणि त्यांना न्यायालयातून काढता पाय घ्यावा लागला.

या प्रकारानंतर संतप्त झालेल्या अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल गोयलवर कायदेशीर अस्त्र उपसले आहे. साहिलने आपल्यावर खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप करून व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा दावा त्यांनी केला आहे. या बदल्यात त्यांनी 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच, केलेले आरोप मागे घेऊन पुढील 48 तासांत सार्वजनिक माफी मागावी आणि भविष्यात असे आरोप न करण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी अट या नोटिशीत घालण्यात आली आहे.

Advocate Ashutosh Shrivastava Sends ₹10 Crore Defamation Notice to Siya Goyal’s Brother Sahil

महत्वाच्या बातम्या