Donald Trump : ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीमुळे युध्दविराम झाल्याचे भारताने पुन्हा नाकारले
अमेरिकेने टॅरिफची धमकी दिल्यामुळे भारताने पाकिस्तान विरुध्द युध्दविराम केल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प सातत्याने करत आहेत. मात्र, ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून ते १० मे रोजी पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धविराम करारापर्यंत, भारत आणि अमेरिका यांच्यात चर्चा झाल्या. या चर्चेत कधीही टॅरिफचा मुद्दा उपस्थित करण्यात आला नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.











