Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Vijay wadettiwar
मुंबई

Vijay Wadettiwar : भाजपच्या इव्हेंटबाजीला मुंबईकर महिलेने दाखवला वास्तवाचा आरसा, विजय वडेट्टीवार यांची टीका

भाजपच्या इव्हेंटबाजीला मुंबईकर महिलेने वास्तवाचा आरसा दाखवला. भाजपच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा ‘इथून चालते व्हा’ हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला,” अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर केली.

महाराष्ट्र, पुणे

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल १४ मे रोजी; वीस वर्षानंतर ‘ जजमेंट डे ‘ ठरला…

राज्यात खळबळ उडवणाऱ्या आणि दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर व त्यांच्या चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा निकाल अखेर जाहीर होणार आहे.

Navi Mumbai
मुंबई

Navi Mumbai : नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात; ४२ हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना ४२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. महापालिका मुख्यालयातील त्यांच्या दालनातच ही कारवाई झाल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

Kharge
देश-विदेश

Kharge : मल्लिकार्जुन खरगे यांची जीभ घसरली, पंतप्रधान मोदी यांचा “दहशतवादी” म्हणून उल्लेख

चेन्नई येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख “दहशतवादी” असा केला. मात्र, त्यानंतर काही वेळातच त्यांनी या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. दरम्यान, खरगे यांनी आपल्या या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली.

Girish Mahajan
मुंबई

Girish Mahajan : जनआक्रोश मोर्चामुळे प्रचंड वाहतूक कोंडीत अडकलेल्या महिलेचा संताप, गिरीश महाजन यांना सुनावले

महिला आरक्षण विधेयक संमत न झाल्याच्या निषेधार्थ आज वरळीत महायुतीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मात्र, मोर्चामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीत तासाभरापासून अडकलेल्या एका सामान्य महिलेचा संयम सुटला आणि तिने थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला. “लोकांना वेठीस धरून रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा बाजूच्या मैदानात जा,” अशा शब्दांत या महिलेने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याने मोर्च्याच्या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

पुणे

पुण्यातून शिंदे गटाचा विधान परिषदेचा उमेदवार कोण; अंतिम क्षणी नवा चेहरा येणार?

आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून पुण्यातून नेमकी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

पुणे

२,००० कोटींच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचा मार्ग मोकळा; प्रशांत वाघमारेंना सुप्रीम कोर्टाचा दणका!

महापालिकेचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.प्रशांत वाघमारे यांच्या विरोधात २,००० कोटींच्या अवैध संपत्ती प्रकरणातील चौकशीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

पुणे

पुणे महापालिकेत सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद; स्थायी समिती अध्यक्षांची थेट अतिरिक्त आयुक्तांना धमकी…

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी सत्ताधारी आणि प्रशासन अधिकाऱ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली.शहरात नव्याने जाहिरात फलक उभारण्याचा धोरणाला मान्यता देण्यावरून स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले आणि प्राजित नायर यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे, महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंचे धक्कातंत्र; माजीमंत्री बच्चू कडूंना विधानपरिषदेची ऑफर..

राज्यात १२ मे रोजी विधानपरिषदेसाठी मतदान पार पडणार आहे,त्यासाठी २३ एप्रिल रोजी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.संख्याबळानुसार भाजपाला पाच,शिवसेना शिंदे गट दोन,राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक तर उर्वरित एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.

Shambhuraj Desai
महाराष्ट्र

Shambhuraj Desai : महेश शिंदे यांच्याकडूनशिवसैनिकांचा अवमान, शंभूराज देसाई यांचा हल्लाबोल विशेष प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात जर शिवसेनेची ताकद नाही असे आमदार महेश शिंदे म्हणत असतील, ते स्वतःच्या मतांवर निवडून आले असे म्हणत असतील तर तो शिवसैनिकांचा अवमान ठरेल, असा हल्लाबोल मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे . पक्षात कोणालाही डावलले जात नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

Pratap Sarnaik
महाराष्ट्र

Pratap Sarnaik : मराठी सक्तीच्या निर्णयावरून वाद तीव्र, रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात संताप

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा वाचता किंवा लिहिता येणे बंधनकारक करण्याच्या निर्णयामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात कडक भूमिका घेत, येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Chitra Wagh
मुंबई

Chitra Wagh : देवेंद्र फडणवीसांसोबत डिबेटवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप, चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळे यांना टोला

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तापले असून, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः म्हटले आहे की ते त्यांच्या समकक्ष नेत्यांसोबतच डिबेट करण्यास तयार आहेत. त्यामुळे जर शरद यांनी विनंती केली आणि ते स्वतः डिबेटसाठी पुढे आले, तर मुख्यमंत्री त्यांच्यासोबत नक्कीच चर्चा करतील, असा टोला वाघ यांनी लगावला आहे.