Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा दर्पोक्ती, मीच थांबविले अन्यथा विनाशकारी अण्वस्त्र युद्ध होऊ शकले असते..
अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी आणण्यास मदत केली आहे. मला खात्री आहे की ही युद्धबंदी कायमस्वरूपी असेल. दोन्ही देशांकडे भरपूर अण्वस्त्रे आहेत, यामुळे विनाशकारी अण्वस्त्र युद्ध होऊ शकले असते. लाखो लोक मारले जाऊ शकले असते, असे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.











