monsoon : १० जूनपूर्वी महाराष्ट्रात मान्सूनची शक्यता नाही; मात्र वादळी पावसाची शक्यता
राज्यातील कडाक्याच्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली असताना हवामान विभागाने मान्सूनबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील बहुतांश भागात किमान १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे











