Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Sexual Harassment
मुंबई

Sexual Harassment : महिलांचा लैंगिक छळ : सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांचे होणार ऑडिट

ज्यभरातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी लागू असलेल्या ‘पॉश’ (PoSH) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आल्यानंतर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांच्या अंतर्गत समितीचे (Internal Committee – IC) ‘विशेष ऑडिट’ करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यासंदर्भात सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले असून, ३० दिवसांच्या आत ऑडिट अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

Vijay Wadettiwar
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : अजित पवार यांचा अपघात नव्हे तर 100 टक्के घातपात, विजय वडेट्टीवार यांचा दावा

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नव्हे तर 100 टक्के घातपात असल्याचा दावा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.

पुणे

People stranded in dubai : पुण्यातील Indira Institute चे ८४ जण दुबईत अडकले; ८० विद्यार्थी, ४ शिक्षकांचा समावेश

People stranded in dubaiइजराइल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर मोठा तणाव वाढला आहे.भारतातील अनेक नागरिक हे दुबई आणि इराण या आखाती देशांत अडकले आहेत. पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्था Indira Institute चे एकूण ८४ जण सध्या दुबई येथे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षकांचा समावेश असून सर्वजण सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे. ही सर्व मंडळी शैक्षणिक “स्टडी व्हिसिट”साठी Dubai येथे गेली होती.

पुणे

Residents Stranded : दुबईत अडकले शेकडो पुणेकर कुटुंबीय हवालदिल : प्रशासनाकडे नाही निश्चित आकडा

Residents Stranded इराण आणि अमेरिकेच्या संभाव्य युद्धाची ठिणगी उडाली असून इराणणे एकाच वेळी आठ देशांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचे युएई, बहरीन, कुवैत, कतार, ओमान, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि इराक या देशांमध्ये लष्करी तळ आहेत. इराणने यापूर्वीच या देशांना अमेरिकेला आश्रय देणाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा इशारा दिला दिलेला होता. दरम्यान, दुबईवर हल्ला झाल्यानंतर पुण्यामध्ये काळजी पसरली आहे. पुण्यामधून दुबई फिरायला गेलेल्या शेकडो भारतीयांच्या चिंतेने कुटुंबीयांना ग्रासले आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना (एडवायजरी) दिलेल्या होत्या. परंतु, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे याबाबत अद्याप कोणताही नेमका आकडा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकांनी आपापल्या नातेवाईकांना संपर्क साधून सुरक्षित असल्याची खात्री करायला सुरुवात केली आहे.

पुणे

Students Stranded in Dubai ‘इंदिरा स्कूल’चे 84 विद्यार्थी दुबईत अडकले; पश्चिम आशियातील संघर्षामुळे उड्डाणे ठप्प

Students Stranded in Dubai पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करण्यात आल्याने पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज (ISBS) या संस्थेचे 84 एमबीएचे विद्यार्थी दुबईत अडकले आहेत. नियोजित पाच दिवसीय शैक्षणिक अभ्यास दौर्‍यासाठी हे विद्यार्थी दुबईला गेले होते.

पुणे

Transporters protest : टोल, कर व ई-चलन नियमांविरोधात ५ मार्चपासून वाहतूकदारांचे बेमुदत आंदोलन

Transporters protest राज्यातील शाळा बस, कर्मचारी वाहतूक बसेस, आंतरराज्य व आंतरशहरी बस, टुरिस्ट कॅब, रिक्षा, टेम्पो तसेच मालवाहतूक करणाऱ्या सार्वजनिक सेवा वाहनांवरील कर, टोल, ई-चलन प्रणाली व अन्यायकारक प्रशासकीय नियमांविरोधात येत्या ५ मार्चपासून लोकसहभागातून बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा वाहतूक संघटना दिला आहे. त्यासाठी महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स अ‍ॅक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर संपावर जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

Israel–US–Iran
देश-विदेश

Israel–US–Iran : इस्रायल-अमेरिका-इराण संघर्ष तीव्र; भारताकडून चिंता व्यक्त, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर तसेच इराणने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू असून प्रदेशात युद्धजन्य वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारताने चिंता व्यक्त करत संयम बाळगण्याचे आणि संवादाद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.

Dhananjay Munde
महाराष्ट्र

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला, तर कार्यक्रम खल्लास, जरांगे, धस यांना इशारा

धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला, तर कार्यक्रम खल्लास… जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय,” असा .इशारा धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळी बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी दिला.

Fadnavis government
मुंबई

Fadnavis government : बांगलादेशी घुसखोरीच्या वाढत्या प्रश्नाबाबत फडणवीस सरकारची शून्य सहिष्णुतेची भूमिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने मुंबईतील व्यावसायिक अवैध बांगलादेशी घुसखोरीच्या वाढत्या प्रश्नाबाबत शून्य सहिष्णुतेची भूमिका घेत आक्रमक कारवाई सुरू केली आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.

Ajit Pawar’s Aircraft
मुंबई

Ajit Pawar’s Aircraft : अजित पवार यांचे विमान कोसळण्यापूर्वी झाडाला धडकले, हवाई उड्डाण मंत्रालयाचा अहवाल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी ते एका झाडाला धडकले होते, अशी माहिती हवाई उड्डाण मंत्रालयाच्या ‘एएआयबी’ (AAIB) तपास यंत्रणेने केलेल्या प्राथमिक तपास अहवालाट प्रसिद्ध केली आहे. अहवालात अपघाताचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी, अपघाताला कारणीभूत ठरू शकणाऱ्या अनेक गंभीर त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे.

Israeli missile
देश-विदेश

Israeli missile : इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले

इस्रायलने शनिवारी (दि. २८) इराणची राजधानी तेहरानवर प्रतिबंधात्मक (Preemptive Strike) क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात तेहरानच्या मध्यवर्ती भागात मोठे स्फोट घडवून आणले त्यामुळे परिसरात दाट धूर पसरला. या घटनेमुळे आधीच तणावपूर्ण असलेली मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी गंभीर बनली असून मोठ्या संघर्षाची भीती व्यक्त केली जात आहे.

Banjara Community
मुंबई

Banjara Community : बंजारा समाजाचा एसटीमध्ये समावेश होणार का?हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वात 6 सदस्यीय समिती स्थापन

राज्य सरकारने बंजारा समाचा एसटी अर्थात अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मुद्यावर अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वात एक 6 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयामुळे कथिपणे नाराज झालेल्या बंजारा समाजाला एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.