विशेष प्रतिनिधी
पुणे : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे हवाई क्षेत्र तात्पुरते बंद करण्यात आल्याने पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज (ISBS) या संस्थेचे 84 एमबीएचे विद्यार्थी दुबईत अडकले आहेत. नियोजित पाच दिवसीय शैक्षणिक अभ्यास दौर्यासाठी हे विद्यार्थी दुबईला गेले होते.Students Stranded in Dubai
संघर्ष तीव्र झाल्यानंतर अनेक उड्डाणे अचानक रद्द किंवा विलंबित करण्यात आली. सुरक्षा कारणास्तव हवाई मार्गांवर निर्बंध घालण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास ठप्प झाला आहे.Students Stranded in Dubai
संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व 84 विद्यार्थी सुरक्षित आहेत. त्यांना हॉटेलमध्ये हलवण्यात आले असून निवास व भोजनाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसोबत गेलेले प्राध्यापक स्थानिक अधिकाऱ्यांशी तसेच विमान कंपन्यांशी सतत संपर्कात आहेत.
विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. जनार्दन पवार यांनी सांगितले, “दरवर्षी आम्ही MBA विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभवासाठी दुबईला घेऊन जातो. मागील 15 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. सध्या 42 मुली आणि 42 मुले दुबईत अडकले आहेत. ते सर्व हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. आम्ही त्यांच्याशी सातत्याने संपर्कात आहोत. परराष्ट्र मंत्रालयाशीही संपर्क साधला आहे.”Students Stranded in Dubai
पुण्यातील पालकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. मुलं सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याने दिलासा मिळाला असला तरी हवाई सेवा कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता कायम आहे.Students Stranded in Dubai
भारतीय प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून उड्डाणे पूर्ववत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.Students Stranded in Dubai