Amol Mitkari : त्यांचे काका गेलेत, त्यामुळे स्टंट म्हणू नका, रोहित पवारांच्या मदतीला अमोल मिटकरी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : रोहित पवारांचे काका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अपघातात गेले आहेत त्यामुळे रोहित पवार जे करत आहे त्याला स्टंट म्हणता येणार नाही. ते न्यायासाठी अनेकांच्या भेटी घेत आहेत, ते VSR आणि डीजीसीएवर FIR का होत नाही म्हणून धडपड करत आहे, त्याला स्टंटबाजी म्हणू शकत नाही, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले.Amol Mitkari

अजित पवार यांचा अपघात धुक्याने झाला की धोक्याने हे आमचेही म्हणणे आहे. अजित पवार यांच्या अपघाताचे गांभीर्य राज ठाकरेंनी ओळखले त्यांनी काही ताशेरे ओढले असतील तर ते फार महत्त्वाचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. आमदार सरोज अहिरे यांचे वक्तव्य काही राजकीय नव्हते ते सहज बोलल्या.Amol Mitkari

अमोल मिटकरी म्हणाले की, अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण होत आहे. पण आजही विश्वास बसत नाही की अजितदादा आपल्यातून निघून गेले असतील. महाराष्ट्रातील जनतेच्या संवेदना पूर्वी होत्या त्या प्रमाणेच आहेत. जनतेच्या मनातील शंकांचं काहूर काही मिटता मिटत नाही. विमान अपघातानंतर ठोस असे काही तपास सुरू झाला नाही. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी FIR नोंदवून न घेणे हे दुर्दैवी फलित आहे. वैमानिकाचा संशयास्पद रेकॉर्ड होता त्यांचा खुलासा झालेला नाही.Amol Mitkari



अमोल मिटकरी म्हणाले की, विमानातील बेकायदेशीर बदल, सीबीआरमधील फेरफार, ब्लॅक बॉक्सचे झालेले नुकसान आता तो सुरक्षित आहेत असे म्हणता आहेत. VSR कंपनीचे राजकीय कनेक्शन, हवामानाचे चुकीचे अंदाज होता की वैमानिकावर काही दबाव होता. बारामतीच्या विमानतळावर अनेक वेळा अजित पवारांचे विमान उतरले होते. तिथल्या भौगोलिक परिस्थितीची त्यांना आणि त्यांच्या वैमानिकांना संपूर्ण माहिती होती. शेवटच्या क्षणी प्रवासाचे साधन बदलणे असो की ऑपरेटर कंपनीची संशयास्पद भुमिका? यामध्ये काही घातपात झाला आहे का? की काही सुसाईड बॉम्बर होता का? पोलिस तपासाऐवजी सीबीआयकडे धाव घेण्याची कारणे काय? असे अनेक सवाल मिटकरी यांनी उपस्थित करत म्हणून जनता घातपाताचा संशय व्यक्त करत आहे.Amol Mitkari

अमोल मिटकरी म्हणाले की, मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलिसांनी FIR न घेतल्यामुळे शंका आणखी बळावते आहे. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या हाती काय आले तर शंका. साहिल मदन, यश, सुमित कपूर हे तिघे कुठे आहेत असा सवाल मिटकरी यांनी केला आहे. सुमित कपूर जर अमेरिकेत असेल तर त्याला तिथे जाऊन शोधावे लागण्याची तयारी ठेवावी लागेल. पक्षाची भूमिका आहे की अजितदादांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. जय पवारांनीही मागणी केली, सुनेत्रा पवार यांनीही ही मागणी केली आहे. Amol Mitkari

“His Uncle Has Passed Away, Don’t Call It a Stunt: Amol Mitkari Comes to Rohit Pawar’s Defense”

महत्वाच्या बातम्या