विशेष प्रतिनिधी
बीड: Dhananjay Munde धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला, तर कार्यक्रम खल्लास… जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय,” असा .इशारा धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळी बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी दिला.Dhananjay Munde
गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात सातत्याने शाब्दिक युद्ध सुरू आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर हा वाद सुरू झाला. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून तो सध्या तुरुंगात आहे.Dhananjay Munde
या घटनेवरून जरांगे पाटील यांनी मुंडेंवर गंभीर आरोप करत टीका केली होती. जरांगे पाटील यांनी आपल्याला मारण्याचा कट रचला जात असल्याचा खळबळजनक दावा केला होता. या प्रकरणात अमोल खुणे नावाच्या तरुणाला संशयित म्हणून अटक करण्यात आली होती, जो सध्या जामिनावर बाहेर आहे. या कटामागेही राजकीय हात असल्याचा संशय जरांगे यांनी व्यक्त केला होता, ज्यामुळे परळी आणि आसपासच्या परिसरात तणाव वाढला होता.
विशेष म्हणजे फड यांनी आपल्या पोस्टमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचाही उल्लेख केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या कथित संबंधांवरून सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान उठवले होते. त्यातूनच धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. धनंजय मुंडे यांना उद्देशून सुरेश धस यांनी आका हा शब्द वापरला होता.
“If Even a Hair of Dhananjay Munde Is Touched, Event Will Be Called Off”: Warning Issued to Jarange and Dhas
महत्वाच्या बातम्या
- Israeli missile : इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले
- जागतिक स्तरावरील संस्थांची मदत घ्या पण शंकांचे निरसन करा, सुनील तटकरे यांची विमान अपघाताबाबत मागणी
- पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगला उपस्थित न राहिल्याने आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन
- Amol Mitkari : त्यांचे काका गेलेत, त्यामुळे स्टंट म्हणू नका, रोहित पवारांच्या मदतीला अमोल मिटकरी