People stranded in dubai : पुण्यातील Indira Institute चे ८४ जण दुबईत अडकले; ८० विद्यार्थी, ४ शिक्षकांचा समावेश

पुणे : इजराइल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर मोठा तणाव वाढला आहे.भारतातील अनेक नागरिक हे दुबई आणि इराण या आखाती देशांत अडकले आहेत. पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्था Indira Institute चे एकूण ८४ जण सध्या दुबई येथे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षकांचा समावेश असून सर्वजण सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे. ही सर्व मंडळी शैक्षणिक “स्टडी व्हिसिट”साठी Dubai येथे गेली होती.People stranded in dubai

प्राथमिक माहितीनुसार, काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे परतीच्या प्रवासात अडथळे निर्माण झाले. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही भीतीची बाब नसल्याचे संस्थेच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक दुबईतील सुरक्षित ठिकाणी थांबले असून त्यांच्या निवास, अन्न आणि अन्य आवश्यक सोयींची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.People stranded in dubai

घटनेची माहिती मिळताच भारत सरकारच्या Ministry of External Affairs ने तातडीने दखल घेतली आहे. संबंधित दूतावासाशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना शक्य तितक्या लवकर भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुबईतील भारतीय अधिकाऱ्यांमार्फत सर्व विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे.People stranded in dubai



नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे प्रयत्न
याशिवाय Ministry of Civil Aviation कडूनही विद्यार्थ्यांच्या परतीसाठी आवश्यक त्या उड्डाण व्यवस्थेबाबत समन्वय सुरू असल्याचे समजते. विमानसेवा आणि प्रवासाशी संबंधित तांत्रिक बाबींचा आढावा घेतला जात असून लवकरच विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.People stranded in dubai

पालकांना घाबरू नये – संस्थेचे आवाहन

दरम्यान, या घटनेनंतर पुण्यातील पालकांमध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, “सर्व विद्यार्थी पूर्णपणे सुरक्षित आहेत. कोणतीही अफवा पसरवू नये किंवा घाबरून जाऊ नये. आम्ही सतत विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत आणि त्यांना लवकरात लवकर मायदेशात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.”People stranded in dubai

संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. संबंधित सरकारी यंत्रणांशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.People stranded in dubai

लवकरच परतीची शक्यता

सध्याच्या घडीला सर्व प्रक्रिया वेगाने सुरू असून येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या परतीबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करून त्यांना नियोजित पद्धतीने भारतात परत आणले जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.People stranded in dubai

दरम्यान, पालक आणि नातेवाईकांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.People stranded in dubai

84 people from Indira Institute in Pune stranded in Dubai; including 80 students, 4 teachers

महत्वाच्या बातम्या