Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Sunil Tatkare
मुंबई

जागतिक स्तरावरील संस्थांची मदत घ्या पण शंकांचे निरसन करा, सुनील तटकरे यांची विमान अपघाताबाबत मागणी

अजितदादांच्या अपघाताबाबत जनसामान्यांच्या मनात असलेल्या सर्व शंकांचे निरसन झाले पाहिजे. गरज पडल्यास या तपासासाठी जागतिक स्तरावरील निष्णात संस्थांची मदत घ्यावी, पण सत्य लवकरात लवकर समोर आले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे.

मुंबई

Amol Mitkari : त्यांचे काका गेलेत, त्यामुळे स्टंट म्हणू नका, रोहित पवारांच्या मदतीला अमोल मिटकरी

Amol Mitkari रोहित पवारांचे काका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अपघातात गेले आहेत त्यामुळे रोहित पवार जे करत आहे त्याला स्टंट म्हणता येणार नाही. ते न्यायासाठी अनेकांच्या भेटी घेत आहेत, ते VSR आणि डीजीसीएवर FIR का होत नाही म्हणून धडपड करत आहे, त्याला स्टंटबाजी म्हणू शकत नाही, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले.

मुंबई

Devendra Fadnavis : अजित पवारांच्या विमान अपघातावर पतंगबाजी नको:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Devendra Fadnavisअजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूवर कुणीही पतंगबाजी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अशा घटना घडतात तेव्हा आपण कोणतीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न करू नये. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. या प्रकरणी आपण मृत व्यक्तीच्या पद व प्रतिष्ठेचा तथा त्याच्या कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचाही विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.

Rohit Pawar
मुंबई

Rohit Pawar : रोहित पवारांना हवं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कब्जा, मंत्री अनिल पाटील यांचा आरोप

रोहित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कब्जा हवा आहे, त्यासाठी ते आमच्या नेत्यांवर खापर फोडत आहेत, असा आरोप मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी केला आहे.

Sunetra Pawar
मुंबई

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिवंगत अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना शिखर बँक घोटाळ्यात पुन्हा ‘क्लीन चीट’!

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणी राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्यांचे दिवंगत पती आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह एकूण 75 जणांना पुन्हा एकदा क्लीन चीट मिळालीय. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नव्यानं तपास सुरू केला होता. जो पूर्ण करत याप्रकरणी आरोपींविरोधात कोणतेही सबळ पुरावे नसल्याचं मुंबई सत्र न्यायालयाला सांगत आपला क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. हा रिपोर्ट आज विशेष सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी स्वीकारत यासंदर्भात दाखल झालेल्या विरोध याचिका फेटाळून लावल्यात.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : हिमालयाच्या मदतीला सह्याद्री पण चालू हिमालय वापर करून सोडून देतो, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली खदखद

हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो. हिमालय चालू आहे, डोक्यावर बर्फ आहेच. थंड डोक्याने सह्याद्रीचा वापर करून घेतो आणि नंतर सोडून देतो, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली खदखद व्यक्त केली.

Chief Minister
मुंबई

Chief Minister : गेल्या दहा वर्षांमध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेत तिप्पट वाढ, मुख्यमंत्र्यांचा पाच ट्रिलियनचा टप्पा गाठण्याचा विश्वास

गेल्या दहा वर्षांमध्ये राज्याची अर्थव्यवस्था तीन पटीने वाढली असून हाच वेग कायम ठेवून आपण पाच ट्रिलियनचा टप्पा गाठू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.

Zilla Parishads
मुंबई

Zilla Parishads : जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीतही होणार स्वीकृत सदस्य नियुक्त

महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीत स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार जिल्हा परिषदेत सदस्य संख्येच्या १० टक्के तर पंचायत समितीमध्ये २० टक्के स्वीकृत सदस्य नियुक्त होतील. त्यामुळे निवडणूक लढवण्याची संधी न मिळालेल्या किंवा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होणार आहे.

मुंबई

Sharad Pawar : ठाकरे गटाचा शरद पवारांशी थेट पंगा, राज्यसभेची जागा साेडण्यास नकार

महापालिका निवडणुकीच्या काळात अजित पवार गटासाेबत जाऊन महाविकास आघाडीला कात्रजचा घाट दाखविणाऱ्या शरद पवारांशी आता शिवसेना ठाकरे गटाने थेट पंगा घेतला आहे. माेठे नेते असतील तरी शरद पवारांसाठी राज्यसभेची जागा साेडण्यास ठाकरे गटाने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

मुंबई

Raj Thackeray: सरकार एफआयआरला का घाबरतंय? अजित पवार विमान अपघातातबाबत राज ठाकरे यांचा सवाल

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत एफआयआर का नोंदवला जात नाही? ३-३ ठिकाणी प्रयत्न करूनही सरकार आडकाठी का आणतंय याची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत. पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव का आणला जातोय? सरकारी दबावामुळे जर एफआयआर नोंदवला जात नाही तर यामागे काहीतरी काळबेर आहे, सरकार एका एफआयआरला का घाबरतंय? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

मुंबई

Chief Minister devendra Fadanvis : ‘का बे’, ‘साल्या’मुळे वाटले पुण्यातून बहिष्कृतच केले जाईल, मुख्यमंत्र्यांनी सांगितली आठवण

नागपूरहून आलाे तेव्हा शब्दाशब्दाला ‘का बे’, ‘साल्या’ अशी ‘सांस्कृतिक’ मराठी बोलत होतो. पण इथे आल्यावर मला लक्षात आले की ही संस्कृती मुंबईला पटण्यासारखी नाही. पुण्यात तर आपल्याला बहिष्कृतच केले जाईल असे मला वाटले. त्यामुळे मी हळूहळू स्वत:ला चांगले मराठी कसे बोलता येईल या दिशेने नेले, अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

Navnath Ban
महाराष्ट्र

Navnath Ban : राऊत, उबाठा गटाचे मराठी भाषा प्रेम पुतना मावशीसारखे, नवनाथ बन यांचे टीकास्त्र

मराठी भाषा गौरव दिनी मराठी भाषेचा ‘उदो उदो’ करायचा आणि शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घ्यायचा, मराठी माणसाला हद्दपार करायचे, मराठी माणसाचा अपमान करायचा आणि अश्लील शिव्या देऊन मराठी भाषेचा अवमान करायचा हे पाप संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि उबाठा गटाने केले आहे. त्यामुळे यांचे मराठी भाषा प्रेम म्हणजे पुतना मावशीच्या पान्ह्यासारखे आहे, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी शुक्रवारी केली.